Shivsena News : शिंदेंच्या सेनेत गेलेले शिवसैनिक ठाकरे सेनेत परतले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Shivsena

Shivsena News : शिंदेंच्या सेनेत गेलेले शिवसैनिक ठाकरे सेनेत परतले

नाशिक : शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांची साथ सोडून शिंदे सेनेत गेलेल्या शिवसैनिकांची पुन्हा घरवापसी सुरू झाली आहे. उद्धव ठाकरे सेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांच्या उपस्थितीत शनिवारी (ता. १८) अनेक शिवसैनिक पुन्हा स्वगृही परतले.

आता अखेरच्या श्वासापर्यंत आम्ही उद्धव साहेबांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू, असे अभिवचन दिले. संजय राऊत यांच्या हस्ते शिवबंधन बांधून त्यांचे पक्षात पुन्हा स्वागत करण्यात आले

खोटी आश्वासने देऊन तसेच दिशाभूल करून आम्हाला गद्दारांच्या कळपात नेण्यात आले होते. परंतु काही दिवसातच आम्हाला फसवणूक झाल्याचे आणि आपण चुकीच्या लोकांच्या कळपात दाखल झाल्याचे निदर्शनास आले.

आम्ही पुन्हा उद्धव साहेबांच्या पक्षात परतण्याचा निर्णय घेतला असे स्वगृही परतलेल्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

स्वगृही परत आलेल्यांमध्ये विनोद नुनसे, स्वप्नील गायकवाड, पवन संसारे, समीर कांबळे, प्रकाश उन्हवणे, सार्थक भामरे, दादू खंडारे, सार्थक तालखेडकर, प्रवीण पवार, किशोर आहेर, अभिलाष चव्हाण, राहुल पिंगळे, चेतन पानसरे, चेतन गायकवाड, सचिन धनेधर, गणेश वाबळे, निखिल पाटील, रोहित बाविस्कर, भवन जाधव, राहुल येवले, मनोज राजपूत, दिनेश शिंदे, भावेश पगार यांचा समावेश आहे.

या वेळी उपनेते सुनील बागूल, संपर्कप्रमुख जयंत दिंडे, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, नितीन आहेर, कुणाल दराडे, सहसंपर्कप्रमुख दत्ता गायकवाड, महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर, माजी आमदार वसंत गिते, निर्मला गावित, माजी महापौर विनायक पांडे, शोभा मगर, शोभा गटकळ, मंगला भास्कर, विलास शिंदे, सचिन मराठे, महेश बडवे, राहुल दराडे, वीरेंद्र टिळे, राजेंद्र क्षीरसागर आदींसह शिवसैनिक व पदाधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :NashikShiv Sena