
Viral Video : एक बॉल चुकला तर एकदा क्लीन बोल्ड; मैदानातल्या टोलेबाजीत उतरले संजय राऊत
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत कायमच कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. त्यांची रोजची पत्रकार परिषद, त्यातून केली जाणारी टोलेबाजी, टीकाटिप्पणी यावरुन चर्चा होणं हे ठरलेलंच आहे. अशातच आता संजय राऊतांची मैदानातली टोलेबाजीसुद्धा पाहायला मिळत आहे.
संजय राऊतांचा क्रिकेट खेळतानाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागला आहे. संजय राऊत सध्या तीन दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान त्यांनी क्रिकेट खेळण्याचा आनंद घेतला. यावेळी व्हिडीओमध्ये कोणीतरी 'गुगली टाक' असंही ओरडताना दिसत आहे.
हेही वाचा - आरामात फेडू शकाल अशीच घ्या कर्जे....
यावेळी फलंदाजी करत असताना संजय राऊतांनी पहिलाच बॉल सोडला. त्यानंतर लगेचच दुसऱ्या बॉलला ते क्लिन बोल्ड झाले. पण त्यांनी हार मानली नाही आणि तिसरा चेंडू खेळण्याआधी बॅट बदलली. आता मात्र पुढच्याच चेंडूला त्यांनी फोर मारला. या खेळादरम्यान, उपस्थित असलेले संजय राऊतांचे समर्थक त्यांच्यासाठी चिअर करत होते, टाळ्यांचा गजर करत होते.