दुकानासमोर महिलांनी गर्दी केली म्हणून वाहनचालकावर कात्रीने वार

Ramkund
Ramkundesakal

नाशिक : डोंबिवली (Dombivali) येथून पंचवटीत दर्शनाला आलेल्या वाहनातील महिला खरेदीसाठी दुकानासमोर जमल्या. त्याचा राग आल्याने दुकानदाराने महिलांना घेऊन आलेल्या वाहनचालकावर कात्रीने वार केले. त्यामुळे पंचवटी रामकुंडावरील या दहशतीने महिलांची मात्र घाबरगुंडी उडाली. यामुळे रामकुंडावरील दहशतीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.

Ramkund
Tourism: फिरायला जायचंय? मग या सुंदर ठिकाणांचा विचार नक्की करा

सूरज गोविंद देवकर (२१, ललित काटा, कल्याण रोड, डोंबिवली), असे जखमी युवकाचे नाव आहे. डोंबिवली येथील काही महिला शुक्रवारी (ता. २५) दुपारी पंचवटीत देवदर्शनाला आल्या होत्या. या महिला दुर्गा मंदिरात जाण्यासाठी गाडीतून उतरल्या. काही महिलांनी रस्त्यावर दुकानासमोर खरेदीसाठी गर्दी केली. दुकानासमोर गर्दी केल्याचा राग आल्याने दुकानातील एकाने थेट कात्रीने सूरज याच्यावर वार केले. त्यात सूरज गंभीर जखमी असून त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे. मुंबईहून (Mumbai) दर्शनाला आलेल्या या महिलांमध्ये काही गरोदर महिला होत्या. दर्शनानंतर त्या शिर्डीला (Shirdi) जाणार होत्या. मात्र पंचवटीत (Panchavati) त्यांना घेउन आलेल्या युवकांवर हल्ला झाल्याने महिला खूप घाबरल्या. त्यांचा सगळा दिवस नाशिकला जिल्हा रुग्णालयाच्या आवारात गेला. पूर्णपणे अपरिचित शहरात गरोधर महिलांच्या या कुंचबनेमुळे जिल्हा रुग्‍णालय परिसरातील स्थानिक रुग्णांच्या नातेवाइकांनी महिलांना मदत केली. नाशिक आणि शिर्डी दर्शन राहिलेच पण दिवसभर मात्र मनस्‍तापाला तोंड द्यावे लागले.

Ramkund
Tourism Updates: शिमल्यात थंडीची लाट; भेटीपूर्वी जाणून घ्या हवामानाची स्थिती

दादागिरीचे प्रकार प्रचंड वाढले

पंचवटीत बाहेरून येणाऱ्या प्रवाशांवर दादागिरीचे प्रकार काही दिवसांत प्रचंड वाढले आहे. यापूर्वी दोन तीनदा याच भागात बाहेरून आलेल्या प्रवाशांना मारहाणीचे प्रकार घडले आहे. बाहेरून नाशिक दर्शनाला येणाऱ्या भाविकांना त्रास देत मारहाण करण्याच्या या प्रकाराने नाशिकची बदनामी होत असून स्थानिक व्यावसायिकही या दहशत दादागिरीला कंटाळले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com