
Nashik News : जिल्ह्यातील हजार गावांसाठी साडेसहा कोटीचा टंचाई आराखडा
नाशिक : उन्हाचा कडाका वाढत आहे. जलस्रोत आटू लागल्याने प्रशासनाने जिल्ह्यातील एक हजार गावांसाठी सुमारे साडेसहा कोटीचा टंचाई आराखडा अंतिम केला आहे. येत्या जूनपर्यतच्या आराखड्यात एक हजार ५४ गावांसाठी हजाराहून अधिक उपाययोजनांना मान्यता देण्यात आली आहे. (Shortage plan of six and half crores for thousand villages in district Nashik News)
राज्यात उन्हाचा कडाका वाढला आहे. वाढत्या उन्हासोबत पाण्याची मागणी वाढू लागली आहे. सहाजिकच गावोगावी टँकरचे नियोजन करण्यात आले आहे.
टंचाई काळातील उपाययोजनांसाठी विविध यंत्रणांच्या गरजा लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील १००१ उपाययोजना केल्या आहेत. वाढत्या टंचाईच्या तोंडावर उपाययोजनांसाठी जूनपर्यंतच्या आराखड्याला मान्यता देण्यात आली आहे.
१०४५ गावांसाठी योजना
जिल्ह्यातील ४१२ गाव आणि ६३३ वाड्या याप्रमाणे १ हजार ४५ गावासाठी टंचाई आराखडा करण्यात आला आहे. त्यात, विंधन विहिरी घेणे, नळ योजनांची दुरुस्ती, विहीर खोली करण, खासगी विहीरी अधिग्रहीत करणे, टँकर किंवा बैलगाडीद्वारे पाणीपुरवठा अशा पारंपारिक उपाययोजनांचे नियोजन करण्यात आले आहे.
हेही वाचा : कॅशबॅक किंवा खरेदीवर सूट मिळणारंच कार्ड निवडा...
उपाययोजना गाव उपाय वाड्यांच्या उपाययोजना एकूण अंदाजे खर्च (लाखात)
प्रगतीतील नळ योजना पूर्ण करणे १६ ०० १६ ००
विंधन विहीरी घेणे ६४ ११९ १८३ १५१. ७०
नळ योजना विशेष दुरुस्ती ०० ०२ ०२ ४.०
विंधन विहीर विशेष दुरुस्ती ०१ ०१ ०२ ०.०
विहीर खोल करणे २२ ०७ २९ ८७.००
खासगी विहीरी अधिग्रहण १६२ ५८ २२० ६३.५०
१०० टँकरद्वारे पाणीपुरवठा २७० २७९ ५४९ ३४९.००
एकूण ५३५ ४६६ १००१ ६५५.२०