Nashik : ‘शुभम’चे नेत्रदीपक यश; एमबीबीएस होण्याचा मिळवला बहुमान

Dr. Shubham Wagh
Dr. Shubham Waghesakal

अभोणा (जि. नाशिक) : इच्छाशक्ती व प्रयत्नांची पराकाष्ठा करण्याची तयारी असेल तर जगात कोणतीच गोष्ट अशक्य नाही. याची प्रचिती म्हणजे शिरसमणी(ता. कळवण) येथील आदिवासी भिल्ल (Tribal Bhil) समाजातील गुणवंत विद्यार्थी शुभम पंडित वाघ. तालुक्यातच नव्हे तर जिल्ह्यात एमबीबीएस (MBBS) ही वैद्यकीय क्षेत्रातील पदवी (Medical Degree) प्राप्त करणारा तो पहिलाच विद्यार्थी ठरला असून, शिरसमणीचे नाव राज्याच्या पटलावर उमटवले आहे. (Shubham Wagh spectacular success being MBBS Nashik News)

डॉ. शुभम यांचे प्राथमिक शिक्षण (Primary Education) जिल्हा परिषद (ZP School) शाळा धानोरे, माध्यमिक शिक्षण रयत शिक्षण संस्थेच्या लोणी येथे, तर उच्च माध्यमिक शिक्षण पद्मश्री विखे- पाटील महाविद्यालय, प्रवरानगर अशा ग्रामीण भागात आणि ते ही मराठी माध्यमांच्या शाळेत झाले. सर्व परीक्षांमध्ये अव्वल नंबर मिळवला आहे. तसेच, पूर्व माध्यमिक, उच्च माध्यमिक शिष्यवृत्ती, डॉ. हेडगेवार प्रज्ञाशोध परीक्षा अशा स्पर्धा परीक्षांमध्ये महाराष्ट्र राज्याच्या गुणवत्ता यादीत येण्याचा सन्मान प्राप्त केला आहे. २०१७ मध्ये झालेल्या नीट परीक्षेत नेत्रदीपक गुण प्राप्त करून मुंबईच्या लोकमान्य टिळक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळवला. याच महाविद्यालयातून प्रथम श्रेणीत एमबीबीएस पदवी संपादन केली. आदिवासी व ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी ते नक्कीच रोल मॉडेल ठरणार आहे.

वडील पंडित वाघ हे डांग सेवा मंडळाच्या अभोणा येथील जनता विद्यालयाचे माजी विद्यार्थी. त्यांनी देखील अतिशय हलाखीच्या परिस्थितीत डीएड, बीएड, नेट- सेट परीक्षेत दैदिप्यमान यश संपादन करून समाजात बहुमान प्राप्त केला. येथील जनता विद्यालयाचे निवृत्त कलाशिक्षक शरद वाघ व त्यांच्या सहकाऱ्यांचे त्यांना मार्गदर्शन लाभले. सध्या ते प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेत प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. डॉ. वाघ यांचा शिरसमणी ग्रामस्थांच्या वतीने नुकताच सत्कार करण्यात आला.

Dr. Shubham Wagh
गोदावरीत मिसळणरे नाल्यांचे फेरसर्व्हेक्षण

याप्रसंगी विविध कार्यकारी सोसायटीचे अध्यक्ष शरद वाघ, कृषी अधिकारी डॉ. श्रीरंग वाघ, प्रगतिशील शेतकरी श्रीकांत वाघ, संदीप शिरसाठ यांनी कौतूक केले. या यशाबद्दल केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार, माजीमंत्री राधाकृष्ण विखे- पाटील, खासदार डॉ. सुजय विखे- पाटील, आमदार नितीन पवार, कल्पना विद्या प्रसारक संस्थेचे अध्यक्ष वसंतराव रौंदळ व ग्रामस्थांनी अभिनंदन केले आहे.

Dr. Shubham Wagh
देश विखारी चक्रात अडकला होता पण...; काँग्रेसवर टीका करत मोदींचं विधान

"माझ्या यशात माझे आई- वडील व प्राथमिक शाळेपासून आतापर्यंतच्या सर्व गुरुजनांचे मोठे योगदान आहे. वडिलांचा संघर्ष मी जवळून पाहिला आहे. यापुढे माझ्या गरीब आदिवासी समाज बांधवांची रुग्णसेवा करण्याचा माझा मानस आहे. समाजबांधवांचे शिक्षणातील गळतीचे प्रमाण रोखण्यासाठी तसेच, शिक्षणाचे महत्व पटवून देण्यासाठी मी कटिबद्ध असणार आहे."

- डॉ. शुभम वाघ, शिरसमणी, ता. कळवण

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com