Leopard
sakal
सिन्नर: तालुक्यातील मुसळगाव व बारागावपिंप्री परिसरात एकाच दिवशी दोन बिबट्यांना पकडण्यात वन विभागाला यश आले. मुसळगाव येथे कोंबड्यांच्या खुराड्यात बिबट्या अडकला, तर बारागाव पिंप्री येथे वन विभागाने लावलेल्या पिंजऱ्यात दुसरा बिबट्या जेरबंद झाला. दोन्ही बिबट्यांना मोहदरी वनोद्यानात सुरक्षित हलविण्यात आले आहे.