leopard
leopardesakal

सिन्नर : बिबट्याच्या दर्शनाने नागरिकांंमध्ये दहशत

फुलेनगर (वावी) येथील पाझर तलाव परिसरात महिनाभरापासून बिबट्याचा वावर आढळून येत आहे. पठाडे वस्तीवरील कानिफनाथ मंदिराजवळ बिबट्याने दर्शन दिल्याने घबराट पसरली आहे.

सिन्नर (जि. नाशिक) : तालुक्यातील फुलेनगर (वावी) येथील पाझर तलाव परिसरात महिनाभरापासून बिबट्याचा वावर आढळून येत आहे. सायंकाळच्या सुमारास पठाडे वस्तीवरील कानिफनाथ मंदिराजवळ बिबट्याने दर्शन दिल्याने घबराट पसरली आहे.

फुलेनगर पाझर तलाव परिसरात बिबट्याचा वावर वाढलाय

गेल्या तीन वर्षांपासून पर्जन्यमान चांगले राहिल्याने, तसेच सिन्नरच्या पूर्व भागातील सर्वांत मोठा असणारा पाझर तलाव पाण्याने भरला असल्याने फुलेनगर परिसरात ऊस लागवडीखालील क्षेत्र वाढले आहे. मका व चाऱ्याची पिके उभी असल्याने बिबट्यास वास्तव्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे. वर्षभरापासून या भागात बिबट्याचा वावर आहे. काही महिन्यांपूर्वी एक मादी बिबट्या वन विभागाने लावलेल्या पिंजऱ्यात जेरबंद झाला होता. या बिबट्याने परिसरातील अनेक जनावरांवर हल्ले केल्याने शेतकरी भयभीत झाले होते. आताही महिनाभरापासून पाझर तलाव परिसरातील थोरात वस्ती, पठाडे वस्ती भागात बिबट्याचे पूर्ण वाढ झालेले बछडे फिरत असल्याचे अनेकांनी पाहिले आहे. शनिवारी कानिफनाथ मंदिराजवळील मोकळ्या जागेत बिबट्याने दर्शन दिले. या वेळी शेतकऱ्यांनी आरडाओरडा केल्याने बिबट्या लगतच्या उसाच्या शेतात पसार झाला.

leopard
चांदवडला तब्बल 3 लाखांचे गोमांस जप्त; तिघे गजाआड

वावी-नांदूरशिंगोटे रस्त्यावरही अनेकदा बिबट्याचे बछडे दृष्टीस पडले आहे. यंदा पाऊस पडला नसला, तरी खोलीकरण केल्यामुळे तलावात पाणीसाठा जैसे थे आहे. अनुकूल अधिवास असल्याने बिबट्याची एखादी जोडी या भागात असावी व त्यांच्यापासून वेगळे झालेले बछडे मानवी वस्तीकडे येत असल्याची भीती शेतकऱ्यांमध्ये आहे. शनिवारी बिबट्याने दर्शन दिल्यानंतर वन विभागास कळविण्यात आले होते. रविवारी (ता. ३१) दुपारी वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी परिसरात येऊन पाहणी केली. शेतकऱ्यांनी घाबरून जाऊ नये, लहान मुले व जनावरांची काळजी घ्यावी, बिबट्या जवळपास असल्याची शंका आल्यास मोठ्या आवाजाचे फटाके वाजवावेत, असे आवाहन वन विभागाने केले आहे.

leopard
शेतकऱ्यांनी दिवाळी साजरी करायची कशी? बाजार समित्या बंद

उद्या काय होईल, याची शेतकऱ्यांना भीती

परिसरात ऊसलागवड मोठ्या प्रमाणात झाली असल्याने बिबट्यास लपण्यासाठी सुरक्षित जागा आहे. महिनाभरापासून दृष्टीस पडणाऱ्या बिबट्याने अद्याप पाळीव जनावरांवर हल्ले केले नसले, तरी उद्या काय होईल, ही भीती शेतकऱ्यांमध्ये आहे. रात्री-अपरात्री पाणी भरण्यासाठी शेतात जावे लागते. वन विभागाने या परिसरात तातडीने पिंजरा लावावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com