Nashik corona update : प्रेस कामगारांनी पाळले सोशल डिस्टन्स..अर्थव्यवस्थेला व सामाजिक व्यवस्थेला लावला मोलाचा हातभार

note press.jpg
note press.jpg

नाशिक : जगभरात कोरोना आजाराने सध्या थैमान घातलेले असताना देशाची अर्थव्यवस्था व समाजव्यवस्था शाबूत राहावी या उद्देशाने नाशिक रोड येथील प्रेस कामगारांनी सोशल डिस्टन्स चे अंतर पाळून भारताच्या अर्थव्यवस्थेला व सामाजिक व्यवस्थेला मोलाचा हातभार लावला आहे.

इंडिया सिक्युरिटी प्रेसमध्ये 22,700 पासपोर्टची निर्मिती

लॉकडाऊनच्या काळात आजपर्यंत देश-विदेशात अडकलेल्या लोकांना सोडवण्यासाठी इतर भारतीय लोकांनी मदत करावी म्हणून 22700 पासपोर्ट ची निर्मिती सोशल डिस्टन्स चे नियम पाळून केली आहे. अनेक भारतीय नागरिक जगाच्या वेगवेगळ्या देशांमध्ये अडकलेले आहेत.त्यांना सोडवण्यासाठी त्यांचे नातेवाईक व भारताच्या केंद्र सरकार चे कसोटीचे प्रयत्न चालू आहे यासाठी इतर देशांची लोकं डाऊन उघडल्यावर अडकलेल्या लोकांचे नातेवाईक भारताचे काही अधिकारी इतर देशांमध्ये त्यांची मदत करण्यासाठी अथवा त्यांना भारतात घेऊन येण्यासाठी जाऊ शकतात याच उद्देशाने वरिष्ठांच्या आदेशानुसार नाशिकरोडच्या आय एस पी म्हणजेच इंडिया सिक्युरिटी प्रेस मध्ये 22,700 पासपोर्टची निर्मिती करण्यात आली आहे. 

सी एन पी सैन्य दलाला नोटांचा पुरवठा

सी एन पी म्हणजेच करन्सी नोट प्रेस ने सैन्य दलातील अधिकारी कर्मचारी जवानांचे पगार करण्यासाठी 20 मिलियन नोटा देवळाली कॅम्प व नाशिकच्या स्टेट बँकेला वितरीत करण्यात आले आहेत लॉक डाऊनलोड सूनही कामगारांनी आळीपाळीने काम करून देशाची सुरक्षा व अति तात्काळ सेवेला प्राधान्य देऊन जोखमीत काम केले.

दिवसातील काही तास काम केले

वरिष्ठांच्या आदेशानुसार भारतातील इतर देशात अडकलेल्या लोकांना मदत करण्यासाठी पासपोर्टची निर्मिती लॉकडाऊन असूनही ठराविक वेळ सुरू ठेवली. यासाठी महत्त्वाच्या विभागातल्या मोजक्या कामगारांनी सोशल डिस्टन्सचा नियम पाळून दिवसातील काही तास काम केले- ज्ञानेश्वर जुंद्रे (मजदूर संघ)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com