नाशिक : कॅम्प भागातील मंदिर तोडणाऱ्या समाजकंटकांवर गुन्हा दाखल

Nashik Crime News
Nashik Crime Newsesakal

मालेगाव (जि. नाशिक) : शहरातील कॅम्प भागातील नामपूर रस्त्यालगत जुने आरटीओ ऑफिसच्या बाजूला सर्वे नं. ३२/१ येथील पन्नास वर्षांपूर्वीचे पुरातन आई माऊली मंदिर बेकायदेशीररित्या तोडणाऱ्या (temple illegal breaking) सचिन पवार व अमोल गरुड या दोघांविरोधात कॅम्प पोलीस ठाण्यात धार्मिक भावना (Religious Emotion) दुखावल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विश्‍वहिंदू परिषदेचे मच्छिंद्र शिर्के यांनी याप्रकरणी तक्रार दिली होती. (social miscreants break temples in Malegaon Camp area case registered Nashik Crime News)

कॅम्प भागातील आई माऊली मंदिर दोन दिवसांपूर्वी अचानक मध्यरात्री संशयितांनी विना परवानगी पाडून टाकले. मंदिराच्या आजूबाजूला दगड व विटांचा खच पाहून नागरीक संतप्त झाले. बहुसंख्य भाविकांनी यासंदर्भात सामाजिक व हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना माहिती दिली. चौकशीनंतर ट्रॅक्टरच्या मदतीने ट्रॅक्टर चालक अमोल गरुड व सचिन पवार उर्फ पप्पू (दोघे रा. कॅम्प) यांनी हे मंदिर पाडल्याचे समजले. मंदिर पाडण्यापूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाची परवानगी घेतली नाही. मंदिराचे बांधकाम बेकायदेशीरित्या तोडल्याप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. सचिन पवार हे नगरसेविका प्रतिभा पवार यांचे पती असल्याने या प्रकरणाला राजकीय रंग प्राप्त झाला आहे.

Nashik Crime News
ताडपत्रीचे दर कडाडले; शेतकरी वर्ग वळला बॅनर खरेदीकडे

भारतीय जनता पक्षाने गुन्हा दाखल झाल्यानंतर आई माऊलींचे मंदिर तोडणाऱ्या संशयितांवर योजनाबध्द कट रचल्याचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी भाजप युवा नेते अद्वय हिरे, जिल्हाध्यक्ष सुरेश निकम, भाजप गटनेते सुनील गायकवाड, व्यापारी आघाडी प्रमुख नितीन पोफळे आदींच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने केली आहे. शिष्टमंडळाने अपर पोलिस अधिक्षक चंद्रकांत खांडवी यांना निवेदन सादर केले. निवेदनात संशयितांनी यापुर्वी खंडणी, दुसऱ्याच्या संपत्तीवर बेकायदा कब्जा, भूखंड विक्रीत गैरव्यवहार, गरीबांची घरे खाली करणे असे गैरप्रकार केल्याचा आरोप केला असून, त्याची चौकशी करण्याची मागणी केली आहे. निवेदनावर मदन गायकवाड, लकी गील, निलेश कचवे, सुनील चौधरी, राजेंद्र शेलार, गुलाब पगारे, महेश लोंढे, दीपक गायकवाड आदींसह ५० पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Nashik Crime News
Nashik : महापालिकेचा खासदार पुत्रास दणका; ठोठावला 4 लाखाचा दंड

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com