Sukanya Samriddhi Yojana : सुकन्या समृद्धी योजनेसाठी टपाल विभागाची विशेष मोहीम; जाणुन घ्या

Sukanya Samriddhi Yojana
Sukanya Samriddhi Yojanaesakal

नाशिक : महिला सबलीकरणाच्या दृष्टिकोनातून टपाल विभागामार्फत सुकन्या समृद्धी योजना सुरू आहे. या योजनेचा लाभ तळागाळातील शेवटच्या घटकापर्यंत पोचण्यासाठी टपाल विभागामार्फत सुकन्या समृद्धी योजनेचे खाते उघडण्यासाठी ९ व १० फेब्रुवारीला विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे,

हेही वाचा : भारतीय क्रिकेटची नवी आशा- पृथ्वी शाॅ

Sukanya Samriddhi Yojana
Jalyukta Shivar Yojana : जलयुक्तचा दुसरा टप्पा; रखडलेल्या कामांना हवे प्राधान्य!

अशी माहिती नाशिक टपाल विभागाचे प्रवर डाक अधीक्षक मोहन अहिरराव यांनी दिली. योजनेचा लाभ दहा वर्षांच्या आतील वयोगटाच्या मुलींसाठी घेता येईल. सुरवातीला रुपये दोनशे पन्नास इतकी रक्कम भरून खाते सुरू करता येते.

त्यानंतर दरवर्षी जास्तीत- जास्त दीड लाख रुपयांपर्यंत या खात्यावर जमा करता येतील. खात्यावर जमा केलेल्या रकमेवर पालकांना आयकरात ८०- सी अंतर्गत सूट घेता येईल. सुकन्या समृद्धी योजनेंतर्गत ७.६ टक्के इतका आकर्षक व्याजदर भारतीय टपाल विभागामार्फत दिले जात आहे.

योजनेचे खाते उघडण्यासाठी १० फेब्रुवारीच्या आत नजीकच्या पोस्ट ऑफिसमध्ये संपर्क साधावा, असे आवाहनही प्रवर डाक अधीक्षक मोहन अहिरराव यांनी केले आहे.

Sukanya Samriddhi Yojana
Nashik News: अंगुलगाव, नगरसूल येथील कामांसाठी 5 लाख मंजूर! अतिरिक्त रोहित्र, नवीन वीजउपकेंद्र होणार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com