नाशिक : महापालिका हद्दीत आयटी पार्कसाठी विशेष महासभा

मान्यता मिळाल्यानंतर आर्थिक विकासाला चालना मिळण्याचा दावा
नाशिक महापालिका
नाशिक महापालिकाsakal

नाशिक : महापालिका हद्दीतील आडगाव शिवारात ताब्यात असलेल्या दहा हेक्टर जागेवर आयटी पार्क तयार करण्यासाठी विशेष महासभा शुक्रवारी (ता. २९) बोलाविण्यात आली आहे. आयटी पार्कला मान्यता मिळाल्यानंतर या भागातील आर्थिक विकासाला चालना मिळेल, असा दावा महापौर सतीश कुलकर्णी यांनी केला. दरम्यान, महापालिकेच्या जागेत पार्कची उभारणी करताना दुसरीकडे पार्कच्या बाजूला लागून असलेल्या जागांमध्येदेखील पार्क उभारण्यासाठी महापालिका पुढाकार घेताना जागा मालकांना सामावून घेणार आहे. या माध्यमातून अधिक जागा उपलब्ध होण्याचा दावा करण्यात आला आहे.

नाशिक महापालिका
फेसबुकला आता 'या' नावाने ओळखले जाणार

शहरात पायाभूत सुविधा मोठ्या प्रमाणात प्रस्तावित करण्यात आल्या असल्या तरी आयटी पार्क या नवीन उद्योग, व्यवसाय पुरेशा प्रमाणात नसल्याने नाशिकमधून बाहेर गावी म्हणजे मुंबई, पुणे, चेन्नई, बेंगळुरू या शहरांमध्ये नोकरीनिमित्त जाणाऱ्यांची संख्या अधिक आहे. त्यामुळे नाशिकमध्येच आयटी पार्कची महापालिकेच्या माध्यमातून स्थापना करून त्याद्वारे स्थानिकांना रोजगार देण्याच्या उद्देशाने महापौर सतीश कुलकर्णी विशेष महासभा आयोजित केली आहे. ओझर विमानतळापासून जवळ असलेल्या आडगाव शिवारात महापालिकेच्या ताब्यात असलेल्या दहा हेक्टर जागेत आयटी पार्कला मान्यता दिली जाणार आहे. प्रस्तावित पार्कसाठी महापालिकेकडून पायाभूत सुविधा पुरविल्या जाणार आहेत. त्यासंदर्भातील प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. आयटी पार्कसाठी तज्ज्ञांचे पॅनल तयार करण्यात आले आहे. त्यात वास्तू विशारद विवेक जायखेडकर, नितीन कुठे, विजय अग्रवाल, विजय सांखला, धनंजय शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आयटी पार्कसाठी नाशिक आयटी असोसिएशनचे तांत्रिक मार्गदर्शन मिळणार आहे. अंदाजपत्रकात दहा कोटींची तरतूद केली जाणार आहे.

आयटी पार्कमधील सुविधा

  • आडगाव शिवारातील सर्वे क्रमांक १९०३ पै. मधील सुमारे ५९,६००० चौरस मीटर क्षेत्र.

  • दहा एकर क्षेत्र महापालिकेच्या ताब्यात.

  • आडगाव- म्हसरुळ लिंक रस्त्यापासून ९०० मी. अंतर.

  • ओझर विमानतळापासून आग्रा रोड मागे ११ किलोमीटर अंतर.

  • पार्कच्या बाजूला मेडीकल कॉलेज, भूजबळ नॉलेज सिटी, महावीर तंत्रनिकेतन महाविद्यालय, ग्रामीण पोलिस मुख्यालय.

  • पार्कच्या जागेत महापालिका पायाभूत सुविधा पुरविणार.

  • इंटरनेट कनेक्शन, सिटी बसची व्यवस्था.

  • वाढीव जागेसाठी महापालिका तरतूद करणार.

"शहराचा सर्वांगीण विकास होण्याचे दृष्टीने आयटी पार्क काळाची गरज आहे. त्यामुळे उद्योगधंद्यांना चालना मिळेल, युवकांना नोकरीची संधी मिळेल. संलग्न परिसरात उद्योग आल्याने त्या अनुषंगाने बाजार, घरे, वाहतुकीची साधने यांना त्याचा फायदा होईल. आयटी पार्कमुळे शैक्षणिक व मेडीकल सुविधेला फायदा होईल. महापालिकेच्या उत्पन्नातदेखील वाढ होईल."

- सतीश कुलकर्णी, महापौर, नाशिक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com