SET Exam : गणितासह विशेष विषयांनी फोडला घाम! 'सेट'ला साडेसात हजार परिक्षार्थींनी लावली हजेरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Candidates who came out from the set exam held on Sunday

SET Exam : गणितासह विशेष विषयांनी फोडला घाम! 'सेट'ला साडेसात हजार परिक्षार्थींनी लावली हजेरी

नाशिक : सहायक प्राध्यापक पदासाठी राज्‍यस्‍तरीय पात्रता परीक्षा अर्थात सेट परीक्षा रविवारी (ता.२६) पार पडली. नाशिक जिल्‍ह्‍यातील सतरा केंद्रांवर पार पडलेल्‍या या परीक्षेस सात हजार ५९५ उमेदवारांनी हजेरी लावली.

पेपर एकमधील गणिताचे प्रश्‍न तर विशेष विषयांवर आधारित पेपर क्रमांक दोनमधील प्रश्‍नांनी परीक्षार्थ्यांना घाम फोडला. (Special subjects including mathematics paper tough Seven half thousand examinees attended SET Exam nashik news)

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे महाराष्ट्रासह गोव्‍यात सेट परीक्षा घेण्यात आली. नियोजित वेळापत्रकानुसार रविवारी ऑफलाईन पद्धतीने ही परीक्षा घेण्यात आली. तीनशे गुणांसाठीच्‍या या परीक्षेत प्रथम सत्रामध्ये शंभर गुणांसाठी असलेल्या पेपर क्रमांक या सामान्‍य ज्ञानावर आधारित पेपरमधील गणितीय सूत्रांप्रमाणे अन्‍य काही प्रश्‍नांची काठिण्य पातळी अधिक राहिल्‍याचे परीक्षार्थ्यांनी सांगितले.

पेपर दोनमध्ये दोनशे गुणांसाठी शंभर प्रश्‍न विचारण्यात आले. संबंधित परीक्षार्थ्यांच्‍या विषयांवर आधारित हा पेपर वेळेत सोडविण्याचे आव्‍हान होते. अनेक विद्यार्थ्यांनी शेवटच्‍या मिनिटापर्यंत प्रश्‍न सोडविण्याचा प्रयत्‍न सुरु ठेवला होता.

हेही वाचा : एका मुलाखतीतून उलगडलेले भैरप्पा!

जिल्‍ह्‍यात अशी राहिली स्‍थिती-

परीक्षेस प्रविष्ट उमेदवार- --------आठ हजार ७७६

परीक्षेस हजर राहिलेले परीक्षार्थी----सात हजार ५९५

परीक्षेस गैरहजर राहिलेले उमेदवार---एक हजार १८१

"सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्‍या मार्गदर्शक तत्त्वांनुसार सेट परीक्षा सुरळितपणे पार पडली. सर्व आवश्‍यक खबरदारी घेण्यासह विद्यापीठातर्फे नियुक्‍त पर्यवेक्षकांच्‍या निगराणीत परीक्षा झाली." - प्राचार्य डॉ. आर. डी. दरेकर, 'सेट' परीक्षा समन्‍वयक, नाशिक जिल्‍हा

टॅग्स :NashikstudentSET Exam