SSC Exam : भूमितीला 5 हजार विद्यार्थ्यांची दांडी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

SSC Exam

SSC Exam : भूमितीला 5 हजार विद्यार्थ्यांची दांडी

नाशिक : दहावीच्‍या परीक्षेत बीजगणित विषयाला कॉपी करणाऱ्या विद्यार्थ्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला. बुधवारी (ता.१५) नियोजित भूमितीचा पेपर नाशिक विभागात सुरळीत पार पडला.

पथकांकडून अनेक केंद्रांची कसून तपासणी करण्यात आली. दरम्‍यान भूमितीच्‍या परीक्षेला विभागात ५ हजार ३३९ विद्यार्थ्यांनी दांडी मारली. (SSC Exam 5 thousand students in geometry nashik news)

हेही वाचा: हिंडेनबर्ग अहवालात तथ्य की ते भारताविरुद्धचे कारस्थान?

दोन दिवसांपूर्वी झालेल्‍या बीजगणिताच्‍या पेपरला नंदुरबारला १३ आणि नाशिक जिल्‍ह्‍यात ९ कॉपीबहाद्दरांवर कारवाई करण्यात आलेली होती. कॉपीच्‍या गैरप्रकारात सहभागी काही परीक्षा केंद्रांवर करडी नजर असल्‍याचे स्‍पष्ट करत मंडळातर्फे विविध भरारी पथकांकडून भेटी दिल्‍या जाणार असल्‍याचे विभागीय मंडळाचे अध्यक्ष नितीन उपासनी यांनी सांगितले होते.

त्‍यानुसार बुधवारी झालेल्‍या भूमितीच्‍या पेपरला पथकांनी विविध केंद्रांना भेट देत झाडाझडती केली. नाशिक विभागात प्रविष्ठ झालेल्‍या एक लाख ९५ हजार ९५८ विद्यार्थ्यांपैकी एक लाख ९० हजार ८३५ विद्यार्थ्यांनी परीक्षेला हजेरी लावली.

पाच हजार ३३९ विद्यार्थी गैरहजर होते. नाशिक जिल्‍ह्‍यात सर्वाधिक एक हजार ७०४ विद्यार्थी गैरहजर होते. धुळे एक हजार २९२, जळगाव एक हजार २१४, आणि नंदुरबारला एक हजार १२९ विद्यार्थ्यांनी परीक्षेला दांडी मारली.

टॅग्स :NashikSSC Exam