Maharashtra SSC Result 2023 : नाशिकचा 4 वर्षांतील निच्चांकी निकाल; यंदाही मुली अव्वल...!

ssc exam result 2023
ssc exam result 2023esakal

Maharashtra SSC Result 2023 : बहुप्रतीक्षित इयत्ता दहावीचा निकाल शुक्रवारी (ता.२) ऑनलाइन पद्धतीने जाहीर झाला आहे. नाशिक विभागाचा चार वर्षांत निच्चांकी निकाल नोंदविला गेला आहे. (ssc exam result 2023 result of nashik is 91 80 percent news)

विभागाचा निकाल ९१.८० टक्‍के असून जळगाव जिल्‍ह्‍याचा सर्वाधिक ९३.२१ टक्‍के लागला आहे. नाशिक जिल्‍ह्‍याचा निकाल ९२.२२ टक्‍के, धुळे ९१.८७ टक्‍के, नंदुरबारचा निकाल ९३.०१ टक्‍के लागला आहे. गुणपत्रिका (मार्कशिट) चे वितरण १४ जूनला शाळांमार्फत केले जाणार आहेत.

शिक्षण मंडळातर्फे दहावीचा निकाल जाहीर केला आहे. मार्च महिन्‍यात घेण्यात आलेल्‍या लेखी परीक्षेचा निकाल जाहीर होताच विद्यार्थ्यांनी जल्‍लोष केला. मोबाईल, स्‍मार्टफोनसह लॅपटॉप, संगणकावर निकाल पाहाण्याची लगबग बघायला मिळाली.

यावर्षी नाशिक विभागाचा निकाल खालावला असून, ९२.२२ टक्‍के निकालाची नोंद झालेली आहे. यापूर्वी मार्च २०२२ मध्ये नाशिक विभागाचा निकाल ९५.९० टक्‍के होता. तर मार्च २०२१ मध्ये ९९.९६ टक्‍के, मार्च २०२० मध्ये ९३.७३ टक्‍के निकाल लागला होता.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

ssc exam result 2023
SSC Results : दहावीनंतर स्ट्रीम निवडताना टाळा या चुका; वाचा काय घ्यावी खबरदारी

विद्यार्थ्यांना गुणांची पडताळणी व उत्तरपत्रिकांच्‍या छायाप्रत, पुनमर्ूल्‍यांकन व स्‍थलांतर प्रमाणपत्रासाठी संबंधित विभागीय मंडळाकडे ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. गुणपडताळणीसाठी शनिवार (ता.३) पासून १२ जूनपर्यंत आणि छायाप्रतीसाठी २२ जूनपर्यंत अर्ज करता येणार आहे.

जुलै-ऑगस्‍टमध्ये होणार्या पुरवणी परीक्षेसाठी पुर्नपरीक्षार्थी व श्रेणी सुधार विद्यार्थ्यांसाठी ७ जूनपासून मंडळाच्‍या संकेतस्‍थळावर ऑनलाइन पद्धतीने आवेदपत्रे भरण्याच्‍या प्रक्रियेला सुरवात होईल.

मुलीच हुशार..

नाशिक विभागात मुलींनीच आघाडी घेतांना घवघवीत यश मिळविले असल्‍याचे आकडेवारीतून समोर येते आहे. नाशिक विभागात एकूण १ लाख ९२ हजार ७५४ विद्यार्थी प्रविष्ठ झालेले होते. यामध्ये १ लाख ४ हजार ४३६ मुले आणि ८८ हजार ३१८ मुलींचा समावेश होता.

यापैकी ९४ हजार ३६० मुले आणि ८३ हजार ४१६ मुली असे एकूण १ लाख ७७ हजार ७७६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. मुलांच्‍या उत्तीर्णाची टक्‍केवारी ९०.३५ टक्‍के असून, मुलींचे उत्तीर्णाचे प्रमाण ९४.४४ टक्‍के आहे.

ssc exam result 2023
SSC Result 2023 : राज्यात दहावीचा निकाल आज दुपारी 1ला; या संकेतस्थळावर विषयनिहाय गुणांची माहिती मिळणार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com