SSC HSC Exam Result: ‘आयएसई’, ‘आयसीएसई’मध्ये विद्यार्थी चमकले! शाळांचा शंभर टक्‍के निकाल | SSC HSC Exam Result Students shine in ISE ICSE 100 percent results of schools nashik news | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

SSC HSC Exam Result

SSC HSC Exam Result: ‘आयएसई’, ‘आयसीएसई’मध्ये विद्यार्थी चमकले! शाळांचा शंभर टक्‍के निकाल

SSC HSC Exam Result : दी कौन्‍सिल फॉर दी इंडियन स्‍कूल सर्टिफिकेट एक्‍झामिनेशन (सीआयएससीई) यांच्‍यातर्फे घेण्यात आलेल्‍या दहावी, बारावीचे निकाल रविवारी (ता.१४) ऑनलाइन पद्धतीने जाहीर झाले.

इंडियन सर्टिफिकेट ऑफ सेकंडरी एज्‍युकेशन (आयसीएसई) अर्थात इयत्ता दहावी, आणि इंडियन स्‍कूल सर्टिफिकेट (आयएससी) अर्थात इयत्ता बारावी या परीक्षांमध्ये नाशिक शहर परिसरातील शाळांनी शंभर टक्‍के निकालाची परंपरा कायम राखली आहे. (SSC HSC Exam Result Students shine in ISE ICSE 100 percent results of schools nashik news)

होरायझन ॲकॅडमी निकाल शंभर टक्‍के

मराठा विद्या प्रसारक समाज संचलित होरायझन ॲकॅडमी या शाळेचा दहावीचा निकाल शंभर टक्‍के लागला आहे. शाळेतून वेदिका शुक्ल, आदित्य काकुस्ते यांनी ९९.२० टक्‍के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला. आशिष रकिबे (९८.६० टक्‍के) द्वितीय, श्रुंगी आरोटे (९८. २० टक्‍के) तृतीय क्रमांक पटकावला आहे.

आकांक्षा गावले, नक्षत्र लालवाणी आणि श्लोका पवार (९८.०० टक्‍के) चौथा तर स्नेहल कोल्हे (९७.८० टक्‍के) याने पाचवा क्रमांक पटकावला आहे. शाळेतील १३१ विद्यार्थ्यांपैकी ४५ विद्यार्थ्यांना ९० टक्क्‍यांहून अधिक तर ६२ विद्यार्थी उत्कृष्ट श्रेणीने उत्तीर्ण झाले.

सर्व यशस्‍वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन मविप्र संस्थेचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे, अध्यक्ष डॉ. सुनील ढिकले, सभापती बाळासाहेब क्षीरसागर, उपाध्यक्ष विश्वास मोरे, चिटणीस दिलीप दळवी, उपसभापती देवराम मोगल यांच्‍यासह शिक्षणाधिकारी प्रा. बी. डी. पाटील, शालेय समिती सदस्यांसह शाळेच्‍या मुख्याध्यापिका मीरा पांडे यांनी केले आहे.

अशोका ग्रुप ऑफ स्कूलचे दहावी, बारावीच्‍या परीक्षेत यश

अशोका ग्रुप ऑफ स्कूल्स, अशोका मार्गाच्‍या विद्यार्थ्यांनी बारावीच्‍या निकालात अव्वल कामगिरी केली आहे. विज्ञान शाखेतून नवीनकुमार लक्ष्मणराज (९७.५ टक्‍के) प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाला आहे.

तर आगम कसालीवाल (९७.५ टक्‍के) द्वितीय, स्वराज उपाध्याय (९६.२५ टक्‍के) तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाला आहे. वाणिज्‍य शाखेतून धवन शेट्टी आणि गर्गेश पाटील (९३.२५ टक्‍के) यांनी संयुक्‍तरित्‍या प्रथम क्रमांक पटकावला आहे.

श्रावणी फरताडे (९२ टक्‍के) द्वितीय, उर्वी रोकडे (९१.२५ टक्‍के) तृतीय क्रमांक लागला आहे. शाळेचा निकाल १०० टक्के लागला असून, वाणिज्य शाखेत ३५ टक्‍के विद्यार्थ्यांनी नव्वद टक्क्‍यांहून अधिक गुण तर सुमारे ५४ टक्‍के विद्यार्थ्यांनी ऐंशी ते नव्वद टक्‍के गुण मिळविले.

तसेच, अशोका ग्रुप ऑफ स्कूलच्या विद्यार्थ्यांनी दहावीच्‍या परीक्षेत शंभर टक्‍के यशाची परंपरा कायम राखली. शाळेतून प्रचेत लुनिया (९८.८० टक्‍के), रिया बधान (९८.६० टक्‍के), शुभलक्ष्मी सुब्रमण्यम (९८.४० टक्‍के) यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक पटकावला आहे.

अशोका ग्रुप ऑफ स्कूलच्या अर्जुन नगर कॅम्पसमधून मानव खांदवे (९८.६० टक्‍के) प्रथम, परव सक्सेना आणि हरज्योत सिंग मीन (९७.८० टक्‍के) द्वितीय, तर कनक सोनी (९७.२० टक्‍के) तृतीय क्रमांक पटकावला आहे.

सर्व यशस्‍वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन अध्यक्ष अशोक कटारिया, व्यवस्थापकीय विश्वस्त आस्था कटारिया, सचिव श्रीकांत शुक्ला, उच्च माध्यमिक मुख्याध्यापिका रेणुका जोशी, उच्च माध्यमिक मुख्याध्यापक प्रमोद त्रिपाठी, उच्च माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका संध्या बोराडे, प्राथमिक विभागाच्या उपप्राचार्या डॉ. प्रिया डिसोझा आदींनी अभिनंदन केले आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

रायन इंटरनॅशनल स्‍कूलचा शंभर टक्‍के निकाला

रायन इंटरनॅशनल स्‍कूलच्‍या विद्यार्थ्यांनी शंभर टक्‍के निकालाची परंपरा राखली आहे. शाळेतून आर्यन जठार (९८.८० टक्‍के) प्रथम, किनिशा जोशी (९८.६० टक्‍के) द्वितीय, रुजल कारवा (९८.२० टक्‍के) तृतीय क्रमांक पटकावला आहे.

शाळेतील सर्व २३२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यशस्‍वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन अध्यक्ष डॉ. ए. एफ पिंन्‍टो, व्‍यवस्‍थापकीय संचालिका डॉ. ग्रेस पिंन्‍टो यांनी केले आहे.

ऑर्चिड स्‍कूलची परंपरा कायम

ऑर्चिड इंटरनॅशनल स्‍कूलच्‍या विद्यार्थ्यांनी यशाची परंपरा कायम राखली आहे. शाळेतून भाविश जाधव याने प्रथम क्रमांक पटकावला आहे. त्रिशाला गवई आणि कस्‍तुरी ठाकरे यांनी संयुक्‍तरित्‍या दुसरा क्रमांक पटकावला.

ईशा राठोड हिने तृतीय क्रमांक पटकावला आहे. सर्व यशस्‍वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन संस्‍थेचे अध्यक्ष डॉ. रवींद्र सपकाळ, उपाध्यक्षा कल्‍याणी सपकाळ यांच्‍यासह शिक्षकांनी केले आहे.

पोदार इंटरनॅशनल स्कूलचा शंभर टक्‍के निकाल

दहावीच्या परीक्षेत पोदार इंटरनॅशनल स्‍कूलच्‍या शंभर टक्‍के विद्यार्थ्यांनी यश मिळविले आहे. अंशुल ताटेड (९८ टक्‍के), मधुरा पाटील (९६.६६ टक्‍के), सतेज कोल्हे (९६.६६ टक्‍के) यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय, व तृतीय क्रमांक पटकावला आहे.

याशिवाय प्रत्युष देशमुख (९६.४७ टक्‍के), कुशाल शनिवारे (९६ टक्‍के) यांनी यशस्‍वी कामगिरी केली. शाळेतील २१ विद्यार्थ्यांनी नव्वद टक्क्‍यांहून अधिक गुण मिळविले. १८ विद्यार्थ्यांनी ८५ टक्क्‍यांहून अधिक गुण मिळविले. यशस्‍वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन प्राचार्य डॉ. मनोहर महाजन, सरव्यवस्थापक समीर वागळे, उपमुख्याध्यापिका सोफी दवे यांनी केले आहे.

फ्रावशी स्‍कूलच्‍या विद्यार्थ्यांचे अनेक विषयांमध्ये शंभर गुण

फ्रावशी इंटरनॅशनल स्‍कूलच्‍या विद्यार्थ्यांनी यश मिळविले आहे. अर्णव देवस्‍थळी (९९ टक्‍के) याने प्रथम क्रमांक पटकावला आहे. लारान्‍या खैरनार आणि तन्‍वी प्रभू (९८.८० टक्‍के) यांनी द्वितीय तर मानसी कुलकर्णी (९८.६० टक्‍के) हिने तृतीय क्रमांक पटकावला आहे.

शाळेतून इंग्रजीतून १४, भूगोल विषयातून १६, जीवशास्‍त्र विषयातून १३, कॉम्प्युटर ॲप्लिकेशनमधून ११, कला विषयातून १, गणित ६, इतिहास-नागरिकशास्त्र विषयातून नऊ विद्यार्थ्यांनी शंभर पैकी शंभर गुण मिळविले आहे. सर्व यशस्‍वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन रतन लथ, शर्वरी लथ यांनी केले आहे.