आजपासून 'कोव्हॅक्सिन'चा उपयोग जेष्ठांच्या दुसऱ्या डोससाठी सुरु | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

covaxin

आजपासून 'कोव्हॅक्सिन'चा उपयोग जेष्ठांच्या दुसऱ्या डोससाठी सुरु


नाशिक : कोव्हॅक्सिन लशीसाठी (Covaxin Vaccine) राज्यभरातून उसळणाऱ्या गर्दीमुळे २२ ते ४५ दिवस उलटून गेलेल्या ४५ वर्षांवरील नागरिकांना दुसरा डोस मिळणे कठीण बनले होते. त्यामुळे गेल्या पंधरा दिवसांपासून विशेषतः ज्येष्ठांना रोज रांगेत उभे राहून परतावे लागत होते. त्यातून तयार झालेल्या नाराजीचा दबाव सरकारवर वाढल्याने अखेर कोव्हॅक्सिन लशीचा उपयोग ४५ वर्षांवरील नागरिकांच्या दुसऱ्या डोससाठी करण्याचा निर्णय आरोग्य विभागाने घेतला. (Starting today covaxin vaccine will be used for the second dose of seniors)

सार्वजनिक आरोग्यसेवेच्या अतिरिक्त संचालक डॉ. अर्चना पाटील यांचा यासंबंधीचा आदेश मंगळवारी (ता. ११) जिल्हा आरोग्याधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक, महापालिकांचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी यांच्यापर्यंत पोचला आहे. त्यामुळे मंगळवारी शक्य नसलेल्या केंद्रांवर बुधवार (ता. १२)पासून कोव्हॅक्सिनचा उपयोग ४५ वर्षांवरील नागरिकांच्या दुसऱ्या डोससाठी सुरू होऊ शकेल. राज्यात १ मेपासून १८ ते ४४ वर्षे वयोगटातील लाभार्थ्यांना कोरोना लसीकरण सुरू करण्यात आले. आतापर्यंत राज्यातील जिल्ह्यांना चार लाख ७९ हजार १५० कोव्हॅक्सिन लशीचे डोस या वयोगटासाठी उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

हेही वाचा: नाशिक शहर-जिल्ह्यात कडक लॉकडाउन; जाणून घ्या लॉकडाउनची नियमावली


कोव्हॅक्सिन दुसरा डोस पाच लाखांसाठी

राज्यात कोव्हॅक्सिनच्या लशीचा दुसरा डोस देण्यासाठी ४५ वर्षांवरील पाच लाखांहून अधिक लाभार्थी आहेत. या वयोगटातील लाभार्थ्यांना लशीचा पुरवठा केंद्र सरकारकडून केला जात आहे. सध्या या लशीचा दुसरा डोस द्यायचा असलेल्या नागरिकांची संख्या वाढत आहे. त्याचअनुषंगाने दुसऱ्या डोसची सूचना जारी करण्यात आली आहे. राज्याच्या निधीतून पुरवठा केलेल्या चार लाख ७९ हजार १५० कोव्हॅक्सिन लशीच्या डोसपैकी काही डोस जिल्ह्यांमध्ये उपलब्ध आहेत. या शिल्लक असलेल्या लशीचा वापर त्या जिल्ह्यातील दुसरा डोस बाकी असलेल्या ४५ वर्षांवरील नागरिकांसाठी करायचा आहे. सध्या पुरवठा केलेल्या आणि शिल्लक असलेल्या कोव्हॅक्सिन लशीचा वापर कोणत्याही वयोगटासाठी पहिल्या डोससाठी करायचा नाही, असे डॉ. पाटील यांनी स्पष्ट केले आहे.

(Starting today covaxin vaccine will be used for the second dose of seniors)

हेही वाचा: कठोर निर्बंधांची जिल्ह्यात आजपासून अंमलबजावणी

Web Title: Starting Today Covaxin Vaccine Will Be Used For The Second Dose Of

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Nashikcorona vaccination
go to top