
State Level Cricket Tournament : नाशिकचे युनायटेड विरुद्ध आघाडीचे गुण! पुष्कर अहिरराव 138 अन् शर्विन किसवे 111
State Level Cricket Tournament : महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या, राज्यस्तरीय १९ वर्षांखालील वयोगटातील आमंत्रितांच्या अव्वल साखळी क्रिकेट ( इन्व्हिटेशन सुपर लीग ) स्पर्धेत, दोन दिवसीय कसोटी सामन्यात नाशिकने युनायटेड विरुद्ध पहिल्या डावातील आघाडीचे गुण घेतले. आर्यन्स क्रिकेट मैदान, पुणे येथे हा सामना झाला. (State Level Cricket invitational Tournament Nashik lead against United Pushkar Ahirrao 138 and Sharwin Kiswe 111 nashik news)
प्रथम फलंदाजी करत नाशिकने पुष्कर अहिरराव १३८ व कर्णधार शर्विन किसवे १११ यांच्या जोरदार शतकांच्या जोरावर ९० षटकांत ४३८ धावा केल्या. मोहम्मद ट्रंकवालाने ८० व साहिल पारखने ७४ धावा केल्या.
उत्तरादाखल युनायटेडने ९० षटकांत २४६ धावा केल्या. केयूर कुलकर्णीने ४ , गुरमान सिंग रेणु व हुजैफ शेखने प्रत्येकी २ तर रोहन शेडगे व समकीत सुराणाने प्रत्येकी १ गडी बाद करत नाशिकला पहिल्या डावातील आघाडीचे गुण मिळवून दिले.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
सुपर लीगच्या ४ सामन्यांत नाशिकने एम सी ए रेड, एम सी व्ही एस व युनायटेड या तीन संघांविरुद्ध पहिल्या डावातील आघाडीचे गुण घेतले व डी व्ही सी एस विरुद्ध गमावले.
या आमंत्रितांच्या एकूण स्पर्धेत नाशिकतर्फे फलंदाजीत कर्णधार शर्विन किसवेने ८ डावांत सर्वाधिक ५५८ तर पुष्कर अहिररावने १३ डावांत ५१९ धावा केल्या. गोलंदाजीत हुजैफ शेखने १६ डावांत सर्वाधिक ३८ तर रोहन शेडगेने ३० बळी घेतले.