Dada Bhuse | संजयआण्णा हिरेंचा आदर्श युवा उद्योजकांनी घ्यावा : भुसे

statement by dada bhuse about sanjay hire nashik news
statement by dada bhuse about sanjay hire nashik newsesakal

मालेगाव : शेतकरी राजाच्या हिताचा उद्योग सुरू करून तालुक्यातील बेरोजगारांच्या हाताला काम मिळवून देणारे संजयआण्णा हिरे यांचा इतर युवा उद्योजकांनी आदर्श घ्यावा. (statement by dada bhuse about sanjay hire nashik news)

रावळगाव-अजंग औद्योगिक वसाहतीत मोठ्या प्रमाणावर जागा असून संजयआण्णा हिरेंनी या ठिकाणी प्रकल्प सुरु करावेत. त्यांना सर्वोतपरी सहकार्य केले जाईल. सुमंगल ग्रुप ऑफ कंपनीचा वाढता विस्तार तालुक्यासाठी गौरवास्पद बाब असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री दादा भुसे यांनी केले.

तालुक्यातील बेळगाव -रावळगाव रस्त्यावरील शिवतीर्थ ॲग्रो फीड्स या नवीन प्रकल्पाचा (पोल्ट्री पॅलेटेड ॲण्ड क्रम्ब्स फीड) उद्‌घाटन पालकमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते झाला. या कार्यक्रमानिमित्त नाशिक जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील भूमीपुत्रांचा नागरी सत्कार व सन्मान सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष राजाराम पानगव्हाणे अध्यक्षस्थानी होते. आमदार सत्यजित तांबे, युवानेते अद्वय हिरे, बारा बलुतेदार मित्र मंडळाचे संस्थापक बंडुकाका बच्छाव, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे, ज्येष्ठ नेते प्रसाद हिरे होते. श्री. पानगव्हाणे, श्री. बच्छाव यांनी संजय हिरे यांचे कौतुक करताना त्यांनी लावलेल्या छोट्याशा रोपाचे वटवृक्षात रूपांतर झाल्याचे सांगितले.

हेही वाचा : तुमच्याकडं कागदी स्वरुपातले शेअर आहेत? मग हे वाचाच....

statement by dada bhuse about sanjay hire nashik news
Nashik News: बाजारात कवडीमोल भाव; रस्त्यावर ओरडून त्यांनी फुकट वाटली कोथिंबिर

पालकमंत्री भुसे व मान्यवरांच्या हस्ते शिवतीर्थ ॲग्रो फीड्स या नवीन प्रकल्पाचा (पोल्ट्री पॅलेटेड ॲण्ड क्रम्ब्स फीड) उद्‌घाटन सोहळा झाला. सुमंगल ग्रुप ऑफ कंपनीज्‌चे अध्यक्ष व मॅनेजिंग डायरेक्टर संजयआण्णा हिरे, मंगलताई हिरे, ऐश्‍वर्या हिरे, यश हिरे, रामराव हिरे, खंडू हिरे आदींनी उपस्थितांचे स्वागत केले.

तसेच उद्योगाच्या वाटचालीबाबत माहिती दिली. यावेळी पालकमंत्री भुसे, आमदार तांबे, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे सदस्य डॉ. प्रतापराव दिघावकर, आमदार सीमा हिरे, नामको बँकेचे अध्यक्ष वसंत गिते, मविप्रचे सरचिटणीस नितीन ठाकरे, बारा बलुतेदार मित्र मंडळाचे संस्थापक, अध्यक्ष बंडुकाका बच्छाव, विशेष सरकारी वकील ॲडव्होकेट शिशिर हिरे, सह्याद्री ॲग्रोचे अध्यक्ष विलास शिंदे, आनंद उद्योग समुहाचे अध्यक्ष उद्धव आहेर,

सिद्धिविनायक हॉस्पिटलचे डॉ. राहुल शिंदे, मविप्रचे चिटणीस दिलीप दळवी, मविप्रचे संचालक ॲडव्होकेट आर. के. बच्छाव, तनिष्का व्यासपीठाच्या सदस्या नीलिमा पाटील, रावळगावचे सरपंच महेश पवार, आघार खुर्द सोसायटीचे अध्यक्ष नवल मोरे, येसगावचे सरपंच सुरेश शेलार, दाभाडीचे सरपंच प्रमोद निकम आदींचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. कार्यक्रमाला मालेगाव तालुक्यासह नाशिक जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील पदाधिकारी, कार्यकर्ते, शेतकरी, व्यावसायिक, उद्योजक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

statement by dada bhuse about sanjay hire nashik news
Nashik News : वीरांच्या मिरवणुकांनी गजबजले शहर; चिमुरड्यांच्या विविध वेशभूषेने वेधले लक्ष!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com