Latest Marathi Article | एका हरवलेल्या मोबाईलची गोष्ट... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Mobile Phone

Nashik : एका हरवलेल्या मोबाईलची गोष्ट...

नांदगाव (जि. नाशिक) : लक्ष्मीपूजनाचा दिवस. दरवर्षीप्रमाणे शेतातील सुदर्शन सायंटिफिक क्लबच्या गुदामात पूजा करून सर्व धामणे परिवार घराकडे परतला. घरी पूजा झाल्यावर अलकाताईंना आपल्या मोबाईलमध्ये काढलेल्या फोटोंची आठवण झाली. ते फोटो ग्रुपवर टाका, असे सागरिका म्हणाली. घरात दहा ते बारा मोबाईल होते. मात्र, फोटो अलकाताईच्या मोबाईलवर काढले होते. मात्र, मोबाईल सापडत नव्हता, म्हणून घरातील वातावरण बदलले.

मोबाईलमधील पेटीएम, फोन पे, जी पे अकाउंट लिंक पासवर्ड आदीची गंभीर चर्चा सुरू झाली. जबाबदारी, बेजाबदारपणा आरोप, प्रत्यारोपांच्या युद्धाने वातावरण तप्त झाले. मोबाईलचे बिल घेऊन पोलिस ठाणे गाठण्यात आले. ठाणे अंमलदार मोरे यांनी जिल्हा एलसीबीच्या ग्रुपवर आयएमए नंबर टाकला. नाशिक सायबरकडे सकाळी ट्रॅकिंग करू, असे आश्वासन दिले. (story of lost mobile Nashik Latest Marathi Article)

हेही वाचा: Surya Grahan 2022 : जप-तप अन् गोदापात्रात अंघोळ..!; भाविकांची रामकुंडावर गर्दी

रात्री कुटंबातील अनिरुध्द आणि अनुराग व अलकाताई यांनी मोबाईल क्रमांक ट्रॅकिंगला टाकला आणि गरमागरम चर्चेनंतर त्यातला डाटा इरेज केला. अनिरुद्धने स्टेट बँकेच्या २४X७ क्रमांकावर संपर्क साधून UPI आणि इतर ॲप ब्लॉक केले. यामुळे सगळ्यांचा जीवात जीव आला. अलकाताई धामणे यांना वाढदिवसाला मुलगी सायली व जावई अर्पितने तो मोबाईल गिफ्ट केला होता. मोबाईल आपल्याकडून गेला म्हणून प्रीती गंभीर झाली. रात्री कोणालाच झोप आली नाही. प्रीतीने रात्री जागून आईला देण्यासाठी नवीन मॉडेल शोधले.

सकाळी शेवटची एक शक्यता म्हणून ती मोबाईल शोधण्यासाठी बेसमेंटमध्ये गेली. आणि तिला आश्चर्याचा धक्काच बसला. ज्याने सगळ्यांची झोप उडवली होती. तो मोबाईल आरामशीर एका गादीवर पहुडलेला दिसला. रात्री तिच्याकडून तो तिथेच राहिला होता. बेसमेंटमध्ये रेंज नसल्याने तो स्वीचऑफ दाखवत होता. त्यामुळे उडालेल्या तर्कवितर्कांच्या वादळाने सर्वांच्या मनाची दाणादाण उडवून दिली होती. अखेर त्याचा शेवट गोड झाल्याचा अनुभव आला.

हेही वाचा: Nashik : शहरात धावणार Electric Bus; NMCचा केंद्र शासनाला पुन्हा प्रस्ताव