Stray Dogs Crisis : सोयगावला मोकाट कुत्र्यांचा उपद्रव; महानगरपालिकेचा ठेका संपल्याने नागरिक हतबल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

stray dogs

Stray Dogs Crisis : सोयगावला मोकाट कुत्र्यांचा उपद्रव; महानगरपालिकेचा ठेका संपल्याने नागरिक हतबल

सोयगाव (जि. नाशिक) : मालेगाव तालुक्यात महानगरपालिकेची मोकाट कुत्रे पकडण्याची मोहीम थंडावली आहे. परिणामी शहरात मोकाट कुत्र्यांचा उच्छाद पुन्हा वाढला आहे. त्याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. त्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.

काही गेल्या काही महिन्यांपासून मोकाट कुत्र्यांचा उपद्रव वाढला आहे. झुंडीनी फिरणारी कुत्री आणि त्यांचे हिंसक रूप रस्त्यावरून जाणाऱ्या येणाऱ्यांना भयावह वाटत आहे.

शहरातील सोयगाव येथील मराठी शाळा परिसर व दौलत नगर, सुनयना कॉलनी, तेजरत्न कॉलनी, तुळजाई कॉलनी मार्गावर मोठ्या प्रमाणात मोकाट भटक्या कुत्रांचा त्रास वाढला असून नागरिकांच्या जिवाला धोका तयार झाला आहे. (Stray dogs nuisance in Soygaon Citizens desperate as municipal corporations contract ends nashik news)

गावातील मुख्य रस्ते त्याबरोबरच गल्लीबोळात भटक्या कुत्र्यांचे कळप मोकाट फिरताना दिसत आहेत. या कुत्र्यांमुळे नागरिकांत विशेषतः विद्यार्थी, महिला वर्गात असुरक्षितता निर्माण झाली आहे.

पालिकेतर्फे शहरात कुत्री पकडण्याची मोहीम जोरदारपणे राबवली होती. परंतु कुत्रे पकडणाऱ्या कंपनीचे कंत्राट संपले असल्याचे कारण महानगरपालिका कर्मचारी सांगत आहेत.

त्यामुळे नवीन निविदा निघत नाही तोपर्यंत परिसरातील नागरिकांना मोकाट कुत्र्यांचा त्रास सहन करावा लागणार असल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. या कडे पालिका प्रशासनाचे लक्ष जाणार का? असा सवाल नागरिकांतून विचारला जात आहे.

हेही वाचा : अल्पमतातील निवाडे आणि सामान्य माणूस

मनपा प्रशासनाकडून कानाडोळा

शहरातील अनेक भागात मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट झाला आहे. वाहनचालकांवर, पादचाऱ्यांवर अचानक कुत्रे टोळीने धावून जात आहेत. रात्रीच्या वेळी तर रस्त्याने जाताना केव्हा कुत्रे अचानक अंगावर धावेल याचा नेम राहिलेला नाही.

उर्किरड्यावर फेकलेल्या वस्तू उचलून आणून नागरिकांच्या दारात टाकणे, त्यामुळे महिला, लहान मुलांमध्ये भीती पसरली आहे. सुनयना कॉलनीत अनेकांना मोकाट कुत्र्यांनी चावा घेतल्याच्या घटना घडल्या आहेत.

त्यामुळे कुत्र्यांच्या दहशतीचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. मोकाट कुत्र्यांनी हैदोस घातलेला असतानाही मनपा प्रशासन गंभीर नसल्याचे दिसून येते. कुत्रे पकडण्यासाठी विभागनिहाय पथके स्थापन करण्याची गरज आहे.

सध्या मनपाकडे केवळ एक डॉग व्हॅन असून अपुरे कर्मचारी व साधनांमुळे वारंवार मागणी करूनही व्हॅन येत नसल्याच्याही तक्रारी वाढल्या आहेत.

टॅग्स :MalegaonNashikStray Dogs