दुचाकी, सोनसाखळी चोरी रोखण्यासाठी कडेकोट नाकाबंदी

Police blockade
Police blockadeesakal

नाशिक : शहरामध्ये दुचाकी चोरी, सोनसाखळी (Chain Snatching) ओरबाडण्याचे प्रकार सातत्याने घडत आहेत. दुचाकी चोरट्यांचा (Bike Thief) वाढता सुळसुळाट वाढलेला असताना, आळा घालण्यासाठी पोलिसांनी शहरभर कडेकोट नाकाबंदी सुरू केली आहे. दुचाकीस्वारांकडे वाहनाच्या कागदपत्रांची तपासणी केली जात आहे. (Strict blockade to prevent theft of two wheelers and gold chains Nashik Crime News)

शहरामध्ये सातत्याने दुचाकींची चोरी होते आहे. मंगळवारी (ता.२८) मध्यरात्री शहर परिसरातून पाच दुचाकी चोरी झाल्याप्रकरणी संबंधित पोलिस ठाण्यांमध्ये दाखल आहेत. यामुळे वाहनधारकांमध्ये भितीचे वातावरण असून, दुचाकीची सुरक्षितता कशी करावी, असाच प्रश्‍न आहे. तर, दुसरीकडे पोलिसांची सातत्याने नाकाबंदी सुरू असते, तरीही दुचाकींची चोरी आणि सोनसाखळी ओरबाडण्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे पोलिसांच्या कारभारावरच प्रश्‍नचिन्ह उपस्थित होऊ लागला आहे. दरम्यान, दोन दिवसांपासून शहरात पोलिस ठाण्यानिहाय सकाळी व सायंकाळपासून मध्यरात्रीपर्यंत कडेकोट नाकाबंदी करण्याचे आदेश पोलिस आयुक्त जयंत नाईकनवरे यांनी दिले आहेत.

Police blockade
55 हजाराचा ऐवज चोरट्यांनी केला लंपास

त्यानुसार, शहरात सायंकाळी शहरातील मुख्य रस्त्यांसह बाजारपेठ व कॉलनी रस्त्यांच्या चौकांमध्येही पोलिसांनी नाकाबंदी केल्याचे पहावयास मिळाले. नाकाबंदी दरम्यान, पोलिसांनी दुचाकीस्वारांना लक्ष्य केले आहे. बॅरिकेटिंग करून दुचाकीस्वारांना अडविले जात असून, त्यांच्याकडील परवाना, वाहनाची कागदपत्रे तपासली जात आहेत. प्रामुख्याने सिडको, इंदिरानगर, उपनगर, पंचवटी, गंगापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये नाकाबंदी पॉइंट्स वाढविण्यात आले असून, वाहनचालकांची कसून तपासणी केली जात आहे.

Police blockade
Nashik : आगामी कुंभमेळा सन 2027 च्या तारखा आखाडा परिषदेकडे सादर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com