पोटाची खळगी भरविण्यासाठी सरसावले विद्यार्थ्यांचे हात!

students help
students helpesakal

नाशिक : लॉकडाउनने (lockdown) अनेकांचा रोजगार हिरावलाच, पण अनेकांना एक वेळचे जेवणदेखील दुरापास्त केले आहे. अशा अडचणीत हातावर पोट असलेल्या भुकेलेल्यांच्या पोटाची खळगी भरण्यासाठी सामाजिक भान राखून विद्यार्थी पुढे सरसावले. तीन दिवस गरजवंतासाठी अन्नदाते बनत या भावी फार्मसिस्टनी त्याची भूक भागवली. (students-helps-hungry-people-lockdown-marathi-news)

‘एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ’

‘एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ’ या तुकारामांच्या सुंदर वचनाला अनुसरून एकलहरे येथील मातोश्री कॉलेज ऑफ फार्मसीच्या विद्यार्थ्यांनी गरजूंना आपल्याकडून केलेली एक किरकोळ मदतही समोरील व्यक्तीच्या जीवनात बदल घडवून आणू शकते, हा तीनदिवसीय उपक्रम राबवून सर्वांसमोर एक आदर्श निर्माण केला आहे. अंतिम वर्षाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी प्रतीक गुजरानी, विजय बारसाळे, शुभम खैरे, जयेश कदम, पूर्वा धोंडगे यांच्या संकल्पनेतून गरजू, गरीब, अनाथ लोकांना तपोवन, पंचवटी, रामकुंड येथे अन्नदान, मास्कचे वितरण, सॅनिटायझेशनचे महत्त्व, स्वच्छता अभियान, लहान मुलांना बिस्किटवाटप, लसीकरणाबाबत जनजागृती करून समाजापुढे एक चांगला आदर्श निर्माण केला आहे.

भविष्यातही समाजोपयोगी कामे करण्यात नेहमी अग्रभागी

कोरोनासारख्या संकटात लोकांवर उपासमारीची वेळ आली आहे. गरजवंतांना विद्यार्थ्यांच्या पुढाकाराने जेवणाचे डबे वाटण्यात आले. प्राचार्य डॉ. गोकुळ तळेले, पूनम शिंदे, प्रशांत व्यवहारे, श्रद्धा सांगळे, सचिन कापसे आदी शिक्षकांनी या उपक्रमास विशेष मार्गदर्शन केले. प्राचार्य डॉ. तळेले यांनी सांगितले, की या जागतिक महामारीत गेल्या वर्षभरात अनेकांची मोठी वाताहत झाली. अनेकांना खायला अन्नही नाही. अशा परिस्थितीमध्ये मदत करणाऱ्यांचीही कमी नाही. जेवढे शक्य आहे त्या परीने आमचे मातोश्री कॉलेज ऑफ फार्मसीचे विद्यार्थी मदतीसाठी पुढे येत आहेत. महाविद्यालय नेहमी सकारात्मक उपक्रमात सहभागी होते. पूरग्रस्तांना मदत, रक्तदान शिबिर, रासेयोअंतर्गत स्वच्छता अभियान, आधाराश्रमास मदत, श्रमदान, समाजकार्यासाठी नेहमी पुढे असते. विद्यार्थ्यांसह शिक्षक असेच भविष्यातही समाजोपयोगी कामे करण्यात नेहमी अग्रभागी असतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

students help
पदवीधर तरुणाने बांधली दिव्यांग मुलीशी रेशीमगाठ!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com