HSC Success Story: रोज 10 किमी सायकल प्रवासातून मिळविले यश! गोंदेगावची किर्ती मोरे महाविद्यालयात चौथी

kirti More
kirti Moreesakal

चंद्रकांत जगदाळे : सकाळ वृत्तसेवा

HSC Success Story : गोंदेगाव ते लासलगाव असे दहा किलोमीटर अंतर रोज सायकलने गाठून शिक्षण घेणाऱ्या गोंदेगाव येथील किर्ती बाबासाहेब मोरे हिने इयत्ता बारावीत ८३ टक्के गुण मिळविले.

लासलगाव येथील नूतन विद्या प्रसारक मंडळाच्या कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात कला शाखेतून तिने चौथा क्रमांक मिळविला आहे. (Success achieved by cycling 10 km every day Kirti More rank fourth College of Gondegaon hsc result nashik news)

रोजचा सायकल प्रवास, शेतीकामात आईला मदत, सायंकाळी लहान भावंडांच्या शिकविण्या आणि पहाटे अभ्यास असा दिनक्रम आखून यश मिळविणाऱ्या किर्तीचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

बाबासाहेब मोरे हे पत्नी सविता, किर्ती आणि रुपाली या दोन मुली आणि मुलगा तुषार यांच्यासह गोंदेगावला वास्तव्यास आहेत. त्यांची २० गुंठे शेतजमीन असून, वाट्याने कसण्यासाठी अन्य शेतकऱ्यांची जमीन त्यांनी धरलेली आहे.

या व्यतिरिक्त मोलमजुरी करून त्यांचा उदरनिर्वाह चालतो. तशाही परिस्थितीत मोरे यांनी शेतातच दोन खोल्यांचे घर बांधलेले आहे. या अल्पशिक्षित दांम्पत्याची मुलांच्या शिक्षणासाठी मात्र कष्ट उपसण्याची तयारी आहे.

अपत्यांमध्ये किर्ती ही सर्वांत मोठी असल्याने तिने लहानपणापासूनच आई-वडिलांचे कष्ट बघितले आहेत. त्यांच्या कष्टांचे चीज व्हावे म्हणून तिचीही धडपड सुरू असते. शैक्षणिक क्षेत्रात तर प्रगती आहेच; शिवाय शेतातील सर्व कामांचे कौशल्य तिच्याकडे आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

kirti More
Success Story : दृढ निश्चय, आत्मविश्वासाच्या जोरावर अंजली बनली पोलिस शिपाई

दहावीपर्यंत गावातच शिक्षण झाल्यानंतर पुढील शिक्षणासाठी बस प्रवासाला नकार देत किर्तीने घरातील नादुरुस्त सायकल दुरुस्त करवून घेतली. सोबतीला कुणीही नसल्याची खंतही न बाळगता ती रोज दहा किलोमिटर सायकल प्रवास करत असे.

कधी वाटेत सायकल नादुरुस्त झाल्यास पायी चालत जाऊन तिने वर्गात हजेरी लावलेली आहे. रोज सकाळी सातला ती घरातून बाहेर पडून सर्व तासिकांना हजेरी लावायची. विशेष म्हणजे कोणत्याही विषयाची शिकविणी न लावता तीने अभ्यास सुरू ठेवला.

दुपारी घरी परतल्यावर घरातील कामे, आईला मजुरीसाठी मदतीसाठीही ती जात असे. सायंकाळी लहान भावंडांची शिकवणी ती घ्यायची. रात्री दोनला उठून पहाटे सहापर्यंत अभ्यास करायची.

असा नित्यक्रम तिच्या वडिलांनी ‘सकाळ’ला सांगितला. सुट्टीच्या दिवशी मात्र ती दिवसभर आईला मदत करण्यास तत्पर असे. परिस्थितीची जाणीव ठेवून जिद्दीने अभ्यास करत किर्तीने ६०० पैकी ४९६ गुण मिळविले. कला शाखेतून पदवी घेऊन स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करून अधिकारी बनण्याचे तिचे स्वप्न आहे.

kirti More
HSC Success Story : उसनवारीच्या पुस्तकातून यशाला गवसणी!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com