Nashik News : कर्करोगाने ग्रस्त असल्याने गळफास घेत आत्महत्त्या

death
death esakal

Nashik News : जेलरोड परिसरातील सप्तशृंगीनगरमध्ये एकाने राहत्या घरात तोंडाच्या कर्करोगाने ग्रस्त असलेल्या ५४ वर्षीय व्यक्तीने गळफास घेत आत्महत्त्या केल्याची घटना घडली. (Suffering from cancer committed suicide by hanging Nashik News)

death
Crime News: महाराष्ट्र हादरला! १२ वर्षीय बहिणीच्या चारित्र्यावर संशय घेत सख्ख्या भावानेच केली हत्या

अजय मधुकर नागरे (५४, रा. रघुनंदन सोसायटी, लोखंडे मळा, जेलरोड) असे मयत व्यक्तीचे नाव आहे. नागरे यांनी गुरुवारी (ता. ११) दुपारी तीन वाजेच्या सुमारास राहत्या घराच्या हॉलमध्ये ओढणीच्या सहाय्याने गळफास लावून घेतला.

तसेच, ब्लेडने हाताला कापून घेतले होते. नागरे यांना तोंडाचा कर्करोग होता. या आजारपणाला कंटाळून त्यांनी यापूर्वीही एकदा गोळ्यांचा जादा डोस घेत आत्महत्त्येचा प्रयत्न केला होता. तोंडाचा कर्करोग असल्याने अनेक बंधने त्यांच्यावर आल्याने गुरुवारी त्यांनी सुरुवातीला हाताच्या नसा कापण्याचा प्रयत्न केला.

त्यानंतर त्यांनी गळफास लावून घेतला. त्यांनी मृत्युपूर्वी चिठ्ठी लिहून ठेवली असून, त्यात त्यांनी आजारपणाला कंटाळल्याने जीवन संपवित असल्याचे म्हटले आहे. याबाबत कोणालाही जबाबदारी धरू नये असेही चिठ्ठीत म्हटले आहे. त्यांच्या पश्चात भाऊ, पत्नी, मुलगा असा परिवार आहे. याप्रकरणी उपनगर पोलिसात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे

death
Jalgaon Crime : हळदीत धक्का मारल्याच्या कारणावरुन सशस्त्र हल्ला

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com