खुंटेवाडी येथील तरुण शेतकऱ्याची आत्महत्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

mahendra bhamre

खुंटेवाडी येथील तरुण शेतकऱ्याची आत्महत्या

देवळा (जि. नाशिक) : खुंटेवाडी (ता. देवळा) येथील महेंद्र सुरेश भामरे (वय ४२) या तरुण शेतकऱ्याने आत्महत्या (Farmers Suicide) केल्याचे उघड झाले. घडलेल्या या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. विषप्राशन केल्याने त्याचा रविवारी (ता. १) मृत्यू (Death) झाला. (Suicide of a young farmer at Khuntewadi Nashik Farmer Suicide News)

हेही वाचा: राज्यातील ९४ हजार शिक्षकांच्या वेतनवाढीचा मार्ग सुकर

महेंद्रने मोठ्या कष्टाने पिकविलेला कांदा (Onion) शुक्रवारी (ता. २९) बाजारात विक्रीसाठी नेला. परंतु या चांगल्या दर्जाच्या कांद्याला केवळ आठ रुपये प्रतिकिलो भाव मिळाला. यामुळे चिडचिड होत महेंद्रने त्याच दिवशी घरात असलेली कीटकनाशके पिऊन घेतली. हे लक्षात येताच त्यास तातडीने देवळा ग्रामीण रुग्णालय मग मालेगाव आणि नंतर धुळे जिल्हा रुग्णालयात उपचार चालू केले. पण त्यास कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने रविवारी (ता. १) त्याचे निधन झाले.

हेही वाचा: चालत्या रिक्षातून घाबरून तिने उडी मारली अन् जागीच प्राण गमावले

Web Title: Suicide Of A Young Farmer At Khuntewadi Nashik Farmer Suicide News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top