Nashik News : सहायक पोलीस उपनिरीक्षकाची आत्महत्या | Suicide of Assistant Police Sub Inspector Nashik News | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

shivram nikam

Nashik News : सहायक पोलीस उपनिरीक्षकाची आत्महत्या

Nashik News : म्हसरुळ पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले सहायक उपनिरीक्षकाने राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली. शिवराम भाऊराव निकम (वय ५७, रा. म्हसरुळ, नाशिक) असे मयत पोलिस कर्मचाऱ्याचे नाव आहे. (Suicide of Assistant Police Sub Inspector Nashik News)

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

निकम हे आजारपणामुळे काही दिवसांपासून रजेवर होते. कर्तव्यावर हजर होण्याच्या एक दिवस आधीच त्यांनी आत्महत्या केली. निकम यांनी पोलिस आयुक्तालयातील पंचवटी, सरकारवाडा, वाहतूक, विशेष शाखेत सेवा बजावली होती.

काही महिन्यांपासून ते म्हसरुळ पोलिस ठाण्यात कार्यरत होते. निकम हे आजारपणामुळे काही दिवसांपासून रजेवर होते. ड्यूटीवर हजर होण्यापूर्वीच त्यांनी राहत्या घरात गळफास घेतला.

याप्रकरणी म्हसरुळ पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. निकम यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगा, दोन मुली असा परिवार आहे. पोलिस तपासात आजारपणामुळे निकम यांनी आत्महत्या केल्याचा संशय आहे.