Onion Rates Hike : पिंपळगाव बाजार समितीत उन्हाळ कांद्याची बंपर आवक! सरासरी 900 रूपये भाव | Summer Onion bumper in Pimpalgaon Market Committee Average price 900 rupees nashik news | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Queues of vehicles lined up in front of chalis on Monday due to large quantities of onions for sale in the market committee.

Onion Rates Hike : पिंपळगाव बाजार समितीत उन्हाळ कांद्याची बंपर आवक! सरासरी 900 रूपये भाव

Onion Rates Hike : बेमोसमी पावसाने कांद्याला तडाखा बसतो आहे. कांदा सडण्यापेक्षा मिळेल तो भाव पदरात पाडुन घेण्याची मानसिकता शेतकऱ्यांची झाली आहे. त्यामुळे सोमवारी (ता. ८) पिंपळगाव बाजार समितीत जिल्ह्याभरातुन कांद्याची बंपर आवक झाली.

तब्बल ५० हजार क्विंटल कांदा विक्रीसाठी आला. त्यास सरासरी नऊशे रूपये प्रतिक्विंटल असा भाव मिळुन, तब्बल चार कोटी रूपयांची उलाढाल झाली. (Summer Onion bumper in Pimpalgaon Market Committee Average price 900 rupees nashik news)

अवकाळी पावसाच्या कचाट्यातुन उन्हाळा कांदाही सुटलेला नाही. पाऊस व ऊन अशा संमिश्र वातावरणामुळे साठविलेल्या कांद्याचा दर्जाही खालवतो आहे. काढणी केलेला काही कांदा चाळीत साठविण्याबरोबरच विक्रीलाही आणला जात आहे.

सोमवारी पिंपळगांव बाजार समितीत देवळा, चांदवड, मालेगांव, येवला यासह जिल्हाभरातुन कांदा विक्रीसाठी आला. सकाळ व दुपारच्या सत्रात मिळुन दोन हजार दोनशे ट्रॅक्टर व जीपमधुन सुमारे ५० हजार क्विंटल कांद्याची बंपर आवक झाली.

पिंपळगांव बाजार समिती व व्यापाऱ्यांच्या कांदा चाळींसमोर त्यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. कांद्याच्या विक्रमी आवकेने बाजार समिती गजबजली होती. प्रतिक्विंटल किमान सहाशे रूपये, कमाल १ हजार ६०० रूपये, तर सरासरी नऊशे रूपये असा भाव या कांद्याला मिळाला.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

त्यातून सुमारे चार कोटी रूपयांची उलाढाल झाली. त्यामुळे पिंपळगांव शहरातील बाजारपेठत खरेदीसाठी वर्दळ दिसली. याबाबत कांदा व्यापारी दिनेश बागरेचा म्हणाले की, अवकाळी पावसाच्या भीतीने शेतकरी कांदा विक्रीसाठी आणत आहेत.

उत्पादन मोठ्या प्रमाणात झाले असुन, ही आवक पुढील पंधरा दिवस टिकुन राहील. सध्या दुबईला निर्यात होत असुन, उत्तर प्रदेश, बिहार, पंजाब, हरियाणा येथे कांद्याला मागणी आहे. परराज्यातील काही व्यापारी कांदा साठवणुकीच्या दृष्टीने खरेदी करीत आहेत.

टॅग्स :NashikOnion Price