पोलिस कोविड सेंटरमध्ये रुग्णांना सूर्यस्नान; ९० पैकी ६९ रुग्ण उपचारानंतर घरी

पोलिस कोविड सेंटरमधील उपचार पद्धतीसोबत येथील सूर्यस्नान हाही चर्चेचा विषय ठरला आहे
Sunbathing
Sunbathing

नाशिक : पोलिस कोविड केअर सेंटरमध्ये ९० कोविड रुग्ण दाखल झाले असून, ६९ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. पोलिस कोविड सेंटरमधील उपचार पद्धतीसोबत येथील सूर्यस्नान हाही चर्चेचा विषय ठरला आहे.

पोलिस मुख्यालयातील भीष्मराज बाम बहुउद्देशीय सभागृहात पोलिस आयुक्त दीपक पांडे यांनी पोलिस कोविड केअर सेंटरची उभारणी केली असून, दुसऱ्या लाटेत २३ मार्चपासून पुन्हा हे केंद्र कार्यान्वित करण्यात आले असून, त्यात ६० पुरुष, ४० महिला याप्रमाणे १०० बेडची सुविधा करण्यात आली असून, त्यात सहा ऑक्सिजन बेड आहेत. या कोविड सेंटरमध्ये १००८ अमलदार/नातेवाइकांची रॅपिड ॲन्टिजेन टेस्ट करण्यात आली असून, त्यात २६२ रुग्ण कोरोना पाॅझिटिव्ह आढळले. त्यापैकी पोलिस कोविड केअर सेंटरमध्ये ९० कोविड रुग्ण दाखल असून, ६९ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.

सकाळचे सूर्यस्नान, केळी, द्राक्ष या फळांचा नाश्ता, अनुलोम-विलोम प्राणायाम, वरण-वरईचा भात, नाचणीची भाकरी, उकडलेली भाजी (फक्त हळद व काळी मिरी टाकून), सलाद असे जेवण, सायंकाळी पुन्हा सूर्यस्नान, रात्रीच्या जेवणात केळी, द्राक्ष इ.फळे व हळद, काळी-मिरी पावडरसह दूध अशा प्रकारचा व्यायाम व डाएट ठेवण्यात आला आहे. सर्व रुग्णांसाठी दैनंदिन योगामध्ये ताडासन, तिर्यक ताडासन, कटिचक्रासन, शवासन, सूर्यनमस्कार, शंशकासन, जलनेती व प्राणायामामध्ये नाडीशोधन प्राणायाम, अनुलोम-विलोम प्राणायाम, भ्रामरी प्राणायाम व सायंकाळी सूर्यास्तानंतर संक्षिप्त योगनिद्रा असा व्यायाम दिला जातो.

Sunbathing
एकाच आठवड्यात कुटुंब उद्ध्वस्त! महापालिकेच्या ‘बिटको’तील अव्यवस्थेचे तीन बळी

नियमित सूर्यप्रकाशामुळे ‘डी’ जीवनसत्त्व मिळते. त्यामुळे रक्तात असलेल्या कॅल्शियमचे चयापचय होऊन हाडे व स्नायू मजबूत होतात. सूर्यप्रकाशामुळे शरीरात सेेरेटोनिन हार्मोन्स स्त्रावते व त्यामुळे मानसिक स्वास्थ टिकून राहण्यास मदत होते. सूर्यप्रकाशामुळे पिनीअल ग्रंथीमधून दिवसा मेलॅनिन व रात्री मॅलॅटोनिन नावाचे हार्मोन स्त्रवतात. त्यामुळे शांत झोप लागते. सूर्यस्नान कोरोनाच्या रुग्णांसाठी लाभदायक आहे. सोमवारी पोलिस आयुक्तांनी पोलिस कोविड सेंटरला भेट देऊन पाहणी केली.

पोलिस कोविड सेंटरला अंत्यत उच्च प्रतीच्या वैद्यकीय सुविधेसोबतच कोरोना आजारास उपयुक्त असे डाएट व व्यायाम दिला जातो. तसेच सकाळ-सायंकाळ सूर्यस्नान दिले जाते. त्यामुळे रुग्ण लवकर बरे होत आहेत. मलादेखील आमच्या या हक्काच्या कोविड सेंटरमध्ये अंत्यत चांगले उपचार, आहार व व्यायाम मिळत आहे. मी स्वतःला कुटुंबातच असल्यासारखे समजत आहे.

- नीलेश वाघमारे, पोलिस अमलदार

आडगावला प्रयत्न

जिल्हा पोलिस अधीक्षक सचिन पाटील यांनी शहरातील कोविड सेंटरची महिती घेउन आडगाव येथे ग्रामीण पोलिसांसाठी केंद्र सुरू करण्याचा मनोदय व्यक्त केला. त्यामुळे लवकरच आडगावला असे केंद्र कार्यान्वित होणार आहे.

Sunbathing
सावधान! अंत्यसंस्कारासाठी पैसे घेणारी टोळी सक्रिय; मदतकार्याच्या नावाखाली गोरखधंदा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com