Nashik Crime News : अंबड प्राणघातक हल्ला प्रकरणातील संशयितांना अटक

crime news
crime newsesakal

नाशिक : सिमेन्स कंपनीसमोरील पानटपरी चालकाने रुपया जादा घेतल्याच्या किरकोळ कारणावरून संशयितांनी त्याच्यावर तलवारीने प्राणघातक हल्ला केल्याची घटना रविवारी (ता. २६) सायंकाळी घडली.

या वेळी संशयितांनी रस्त्यावर तलवारी फिरवून दहशतही माजविली. याप्रकरणी अंबड पोलिसात प्राणघातक हल्ल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, दोघांना अटक करून न्यायालयासमोर हजर केले असता, चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

crime news
Nashik Crime News: ऐकाव ते नवलचं! चक्क मोबाईल चोराने दिल नवीन फोन घरी आणून देण्याच आश्वासन

कुंदन पाटील, रवी गवई, अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. धनंजय साहेबराव दातीर (रा. आनंद अपार्टमेंट, अंबड) या युवकाच्या फिर्यादीनुसार, त्याचे मामा ज्ञानेश्वर किसन वारुंगसे यांची पानटपरी आहे. या ठिकाणी संशयित आश्विन साळवे, अशोक साळवे, रवी गवई व आणखी एक साथीदार यांचा पानटपरी चालकाशी एक रुपया जादा घेतल्यावरून त्यांच्या वाद झाला.

crime news
Nashik Crime News : पोलिस सुस्तावल्याने भरदिवसा गुंडागर्दी; भररस्त्यावर टोळक्यांच्या हाती हत्यारे

संशयितांनी वारुसंगे यांना मारहाण सुरू केली. हे पाहून दातीर सोडविण्यासाठी गेला असता, संशयित त्याच्यावर धारदार हत्यार घेऊन धावले. त्यामुळे धनंजय याने पळ काढला. संशयितांनी वारुसंगे यांच्यावर धारदार हत्याराने वार करून गंभीर जखमी केले. त्यानंतर संशयितांनी रस्त्यावर येत हत्यारे फिरवून दहशत माजविली.

तसेच काही दुकानांवर दगडफेकही करीत वाहनांचे नुकसान केले. जखमी वारुसंगे यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, याप्रकरणी परस्परविरोधी गुन्हा दाखल केला आहे.

crime news
Nashik Crime News : दिवसा वीटभट्टीवर काम अन्‌ रात्री मोटारसायकलींची चोरी; नगर जिल्ह्यातून तिघांना अटक

यात मारहाणीत आश्विन साळवे जखमी असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. पोलिसांनी या प्रकरणात मारहाणीचा गुन्हा दाखल करून संशयित हरी दातीर, कृष्णा कोठुळे या दोघांना अटक केली आहे. त्यांना न्यायालयाने येत्या ३१ तारखेपर्यंत चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. घटनेचे सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com