Nashik Crime : वर्मा ज्वेलर्स दरोड्यातील संशयितांना अटक; 3 लाखाचा ऐवज जप्त

 arrested
arrested esakal

Nashik Crime : शहरातील मोहनपीर गल्लीतील सराफ पेठेत भरदिवसा वर्मा ज्वेलर्सच्या दुकानात झालेल्या दरोड्या प्रकरणी तीन संशयित महिलांना किल्ला पोलिसांनी अवघ्या ४८ तासात जेरबंद केले.

या गुन्ह्याचा छडा लावण्यात यश आल्याने पोलिसांनी सुटकेचा नि:श्‍वास टाकला असून सराफ असोसिएशननेही पोलिस प्रशासनाच्या कामगिरीचे कौतुक केले आहे.

अटक केलेल्या तिघा महिलांकडून चोरीच्या सोन्यातील सुमारे तीन लाख पाच हजार रुपये किमतीच्या सहा तोळे सोन्याच्या फुल्या जप्त करण्यात आल्या आहेत. (Suspects arrested in Verma Jewelers robbery 3 lakh instead of confiscation Nashik Crime)

सराफ पेठेत मोहनपीर गल्लीतील दर्ग्यासमोर असलेल्या मेसर्स वर्मा गोल्ड ज्वेलर्स या दुकानात मंगळवारी (ता.२३) दुपारी पावणेसहाच्या सुमारास तीन अनोळखी बुरखाधारी महिलांनी सोन्याच्या फुल्या पाहण्याचे निमित्त करून हातचलाखी करुन सव्वासात लाख रुपये किमतीच्या पंधरा तोळे वजनाच्या सोन्याच्या फुल्या व मुरनीचा एक बॉक्स लंपास केला होता.

या प्रकारामुळे सराफ व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली होती. बुरखाधारी महिला ज्वेलर्सच्या सीसीटीव्हीत कैद झाल्या होत्या. ज्वेलर्सचे मालक नटवरलाल शिवरतन वर्मा (वय ५५, रा. बुरुड गल्ली, बालाजी मंदिराच्या पाठीमागे) यांच्या तक्रारीवरून किल्ला पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजची बारकाईने तपासणी करत या महिलांचा माग काढला. जिल्हा पोलिस प्रमुख शहाजी उमाप, अपर पोलिस अधिक्षक अनिकेत भारती यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधिक्षक प्रदीपकुमार जाधव, किल्ला पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक गौतम तायडे, उपनिरीक्षक अभय ढाकणे, हवालदार पाटील, पोलिस शिपाई पंकज भोये, सचिन भामरे, मते, जगताप, बागूल आदींच्या पथकाने या महिलांच्या घरांचा शोध घेतला.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

 arrested
Jalgaon Fraud Crime : 28 लाखांची 2 दुकाने परस्पर पत्नीच्या नावे; संशयितांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा

संशयित महिला सोने चोरट्या असल्याची खात्री झाल्यानंतर साजेदाबानो उर्फ अन्नु बशीर खान (४०, रा. एकबाल डाबी, कुसुंबा रोड), ताहेरा उर्फ आशिया खुर्शीद अहमद (२५, रा. पाचपंजन चौक) व नाजिया शेख इस्माईल (३०, रा. सर्वे नं. ५५, तौसिया कॉलनी) या तिघा महिलांना त्यांच्या घरातूनच अटक केली. त्यांची कसून चौकशी केल्यानंतर त्यांच्याजवळून चोरीच्या गुन्ह्यातील सहा तोळे दागिने जप्त करण्यात आले.

"मेसर्स वर्मा गोल्ड ज्वेलर्स दुकानातील चोरी प्रकरणात तिघा महिलांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याजवळून सहा तोळे सोन्याच्या फुल्या जप्त करण्यात आल्या आहेत. या महिलांचा आणखी काही गुन्ह्यांशी संबंध आहे का याची चौकशी करत आहोत. विविध पोलिस ठाण्यांचे रेकॉर्ड तपासले जात आहेत." - अनिकेत भारती, अपर पोलिस अधिक्षक, मालेगाव

 arrested
Ahmednagar Crime : फेसबुकवरील मैत्री भोवली,३० लाखांला गंडा; ती विधवा असल्याची समजता जवळीक वाढवली

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com