Nashik News : निवृत्त सभासदांच्या कमी केलेल्या मतदान अधिकार आदेशाला स्थगिती

election
electionesakal

Nashik News : जिल्हा सरकारी व परिषद कर्मचारी बँकेच्या प्रारूप मतदारयादीवर हरकती, आक्षेप नोंदविल्यानंतर त्यावर सुनावणी होऊन १२ मेस अंतिम यादी प्रसिद्ध होणार होती, असे असताना सेवानिवृत्त सभासदांचा कमी केलेला मतदानाच्या अधिकार आदेशाला न्यायालयाने स्थगिती दिली आहे.

याबाबत बँकेकडून तसेच सेवानिवृत्त कर्मचारी सभासदांकडून न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. यात झालेल्या सुनावणीत १२ जूनपर्यंत स्थगिती देण्यात आली आहे. (Suspension of reduced voting rights order of retired members Nashik News)

जिल्हा सरकारी व परिषद कर्मचारी बँक निवडणुकीचा मतदार याद्यांचा कार्यक्रम घोषित झाला असून, १७ एप्रिलला सात हजार ८५३ मतदारांची प्रारूप यादी प्रसिद्ध झाली आहे. त्यावर, २६ एप्रिलपर्यंत हरकती मागविण्यात आल्या होत्या.

सहकार प्राधिकरणाने शासकीय कर्मचारी बँका, पतसंस्था, नागरी बँकांच्या कायद्यात दुरुस्ती केली. यात शासकीय सेवेतून सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांचे सभासदत्व अबाधित ठेवत त्यांचा मतदानाचा अधिकार कमी केला आहे.

त्यामुळे बॅंकेच्या एकूण १५ हजार ८३८ सभासदांपैकी सुमारे ७ हजार ९८५ सभासद कमी झाले आहेत. या निर्णयामुळे सेवानिवृत्त झालेल्या सभासदांनीच हरकती नोंदविल्या. एकूण नोंदविल्या गेलेल्या १८९ हरकतींपैकी १०० हून अधिक हरकती याबाबत होत्या.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

election
Water Reservation : दारणा समूहातून 100 दशलक्ष घनफूट पाणी

हरकती नोंदविल्या असतानाच दुसरीकडे, या सेवानिवृत्त सभासद तसेच जिल्हा सरकारी व परिषद बँकेच्या वतीने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. यावर मंगळवारी (ता.९) सुनावणी प्रक्रीया झाली.

यात न्यायालयाने सहकार विभागाने २० फेब्रुवारी रोजी काढलेल्या सेवानिवृत्त सभासदांच्या कमी करण्यात आलेल्या मतदान अधिकार आदेशाला स्थगिती दिली आहे. १२ जूनपर्यंत निवडणुकीस स्थगिती दिल्याचे न्यायालयाचे आदेशात म्हटले आहे.

आदेशाला स्थगिती मिळाल्याने बँकेच्या निवडणुकीबाबत आता जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडून कोणता निर्णय घेतला जातो, याकडे आता लक्ष लागले आहे.

election
Road Damage Fee : अवाजवी रस्ता तोडफोड शुल्कवाढ अखेर मागे; व्यावसायिक दर कायम

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com