गाेव्याच्या दंगलीतील संशयित नाशिकमध्ये जेरबंद | Nashik

Suspicion of goa riots arrested in Nashik
Suspicion of goa riots arrested in Nashikesakal

नाशिक : गोवा (Goa) राज्यातील कलंगुट (Calangute) पाेलिस ठाण्याच्या हद्दीत दंगल घडवून प्राणघातक हल्ला केल्याच्या गुन्ह्यातील संशयित आरोपीला युनिट-1 च्या पथकाने सारडा सर्कलवर पाठलाग करुन पकडले. त्याचा ताबा नाॅर्थ गाेवा (North Goa) पाेलिसांच्या गुन्हेशाखेकडे देण्यात आला आहे.

पाेलिसांना पाहताच केला पळून जाण्याचा प्रयत्न

सुनिल नारायण भूमकर (३६ रा. कलंगुट, राज्य गोवा) असे संशयिताचे नाव आहे. गाेवा येथील कलंगुट पोलिस ठाण्यात (गुन्हा रजिस्टर नंबर १९३/२१) दाखल असलेल्या गुन्ह्यात संशयित भूमकर पसार हाेता. त्याचा नाॅर्थ गाेवा पाेलिसांची गुन्हे शाखा तसेच नाशिक पोलिस शाेध घेत हाेते. भूमकरचा शोध घेण्यासाठी युनिट-1ने मदत करतांना पोलिस निरीक्षक आनंद गावकर पथकासह शनिवारी सकाळी नाशिकमध्ये आले. भूमकर हा द्वारका येथे येणार असल्याचे विजय ढमाळ यांना सांगितली.

Suspicion of goa riots arrested in Nashik
जळगाव : येऊ द्या कोरोना, आम्ही मास्क लावणारच नाही

त्यानुसार युनिट-1चे विजय ढमाळ, सहायक निरीक्षक खैरनार, उपनिरीक्षक उगले, एएसआय बागुल तसेच गाेवा पाेलिसांचे पथक द्वारका परिसरातील लॉज व हाॅटेल तपासत असतांना सारडा सर्कलवरील हॉटेल एस. एम. इंम्पिरियल येथे भूमकर दिसून आला. पाेलिसांना पाहताच त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, पथकाने त्याचा पाठलाग केला. तसेच थाेड्या झटापटीनंतर त्याला ताब्यात घेतले. त्याची नाेंद व वैद्यकीय तपासणी करून ताबा गाेवा पाेलिसांकडे दिला.

Suspicion of goa riots arrested in Nashik
धक्कादायक! नाशिकमध्ये चालता बोलता पाच जणांचे मृत्यू

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com