esakal | मध्यरात्रीचा थरार! स्वामी समर्थ केंद्राची भरलेली दानपेटी फोडली; परिसरात घबराटीचे वातावरण
sakal

बोलून बातमी शोधा

samarth chori.jpg

रविवारी मध्यरात्री तीनच्या सुमारास तीन अज्ञात चोरट्यांनी केंद्राच्या भिंतीवरून प्रवेश करीत गाभाऱ्यातील दानपेटी लोखंडी हत्याराने तोडण्याचा सुमारे अर्धा तास प्रयत्न केला. पण...

मध्यरात्रीचा थरार! स्वामी समर्थ केंद्राची भरलेली दानपेटी फोडली; परिसरात घबराटीचे वातावरण

sakal_logo
By
संतोष विंचू

नाशिक / येवला : रविवारी मध्यरात्री तीनच्या सुमारास तीन अज्ञात चोरट्यांनी केंद्राच्या भिंतीवरून प्रवेश करीत गाभाऱ्यातील दानपेटी लोखंडी हत्याराने तोडण्याचा सुमारे अर्धा तास प्रयत्न केला. पण...

काय घडले नेमके?
रविवारी मध्यरात्री तीनच्या सुमारास तीन अज्ञात चोरट्यांनी केंद्राच्या भिंतीवरून प्रवेश करीत गाभाऱ्यातील दानपेटी लोखंडी हत्याराने तोडण्याचा सुमारे अर्धा तास प्रयत्न केला. दानपेटी फोडून सुमारे ३५ हजार रुपयांचा ऐवज घेऊन चोरटे पसार झाले. लॉकडाऊन काळात केंद्र मार्चपासून बंद असल्याने दानपेटीतील दान रक्कम जास्तही असण्याची शक्यता आहे. याप्रकरणी केंद्रप्रमुख दत्तात्रय जाधव यांनी गुन्हा दाखल केला आहे. शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप कोळी, सहा.पोलीस निरीक्षक मनोहर मोरे, पोलीस चंद्रकांत निर्मळ यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी करत सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले आहेत. चोरीची घटना ही दाट नागरी वस्तीत घडली असून या घटनेमुळे परिसरात राहणाऱ्यांमध्ये घबराटीचे वातावरण आहे. 

हेही वाचा > पहाटेची वेळ...मंदिरात आश्रयाला थांबलेले गुराखी दुर्गंधीने अस्वस्थ; शोध घेताच बसला धक्का

सीसीटीव्हीत कैद

शहरातील पारेगाव रोड परिसरात श्री स्वामी समर्थ सेवा केंद्राच्या दानपेटीतील सुमारे ३५ हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना रविवार (ता.२३) घडली. चोरटे सुमारे अर्धा तास चोरी करत असल्याचे सीसीटीव्हीत कैद झाले आहे. 

हेही वाचा > भरचौकात 'त्याने' थेट वाहतूक पोलिसाच्याच श्रीमुखात भडकावली...नेमके काय घडले?

संपादन - ज्योती देवरे


 

loading image
go to top