Crime Alert : शहरात तडीपारांचा वाढला वावर! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nashik Crime News

Crime Alert : शहरात तडीपारांचा वाढला वावर!

जुने नाशिक : शहरातील तडीपारांचा (Tadipar) वाढता वावर लक्षात घेता सराईत संशयितांवर तडीपारीची करण्यात येणारी कारवाई केवळ नावालाच आहे. पोलिसांच्या सध्याच्या विशेष मोहिमेअंतर्गत दैनंदिन येणाऱ्या आकडेवारीतून स्पष्ट होत आहे. (Tadipar on the rise in city Nashik Crime News)

गेल्या काही दिवसात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. महिनाभरात नऊ खुनाच्या घटना घडल्या आहे. गुन्हेगारांवर पोलिसांचा वचक राहिला नाही, अशा चर्चांना उधाण आले होते. त्यानिमित्ताने पोलिस आयुक्तालयाने काही दिवसांपासून शहराच्या प्रत्येक पोलिस ठाण्याच्या हद्दीत विशेष मोहीम राबविण्यास सुरवात केली आहे. टवाळखोरांवर कारवाई करणे, रेकॉर्डवरील गुन्हेगारांचे तपासणी, तडीपार संशयितांची तपासणी, अवैध धंद्यांवर छापे, अशा विविध कारवाईचा समावेश आहे. प्रत्येक पोलिस ठाण्याकडून दैनंदिन एक ते दोन तडीपारांवर कारवाई करत अटक केल्याची माहिती समोर येत आहे. आकडेवारीनुसार दैनंदिन पाचपेक्षा अधिक तडीपार संशयितांना अटक करण्यात येत आहे.

हेही वाचा: Nashik : पूरस्थितीत अतिरिक्त बससेवा राज्य परिवहन महामंडळाचे नियोजन

यावरून शहरात तडीपारांचा वावर किती प्रमाणात वाढला आहे, हे स्पष्ट होत आहे. पोलिसांनी अटक केले तरी केवळ प्रतिबंधात्मक गुन्हा दाखल होतो. न्यायालयाकडून लगेचच जामीन मिळून संशयित बाहेर पडतो. त्यामुळे संशयितांची हिंमत वाढली असून, तडीपार असताना त्यांचा वावर शहरात दिसून येत आहे. अशा घटनांवर आळा बसावा यासाठी तत्कालीन पोलिस आयुक्त दीपक पांडे यांनी तडीपार संशयितांवर एमपीडी कलमानुसार कारवाई करण्यास सुरवात केली होती. अनेक तडीपारांवर अशा प्रकारे कारवाई करत मध्यवर्ती कारागृहाचा रस्ता दाखविला होता. या कारवाईचा परिणाम असा झाला, की शहरातील तडीपारांचा वावर एकदमच कमी झाला होता. पुन्हा अशाच प्रकारची कारवाई करण्याची वेळ आली आहे.

हेही वाचा: 1 हजार वाहनांवर GPS प्रणाली; नोंदणीसाठी 31 जुलैपर्यंत मुदत

Web Title: Tadipar On The Rise In City Nashik Crime News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Nashikcrime
go to top