जिवंत लोककलेवरच घाला का? तमाशा कलावंतांवर गाशा गुंडाळण्याची नामुष्की

tamasha artist
tamasha artistesakal

नाशिक : राजाश्रय गमावलेली व लोकाश्रयाच्या भरवशावर मराठी मुलुखात कलासाधनेच्या माध्यमातून लोकप्रबोधन करणारी लोककला शासनाच्या उदासीन धोरणामुळे मरणपंथाला लागली आहे. कोविडच्या (Covid) शासन घोषित निर्बंधामुळे महाराष्ट्रातील तमाम लोककलावंतांवर सध्या उपासमारीची वेळ आली आहे. चित्रपटगृहांची कवाडे खोलणाऱ्या शासनाने कनातींचा गाशा गुंडाळून ठेवल्याने प्रतिभासंपन्न लोककलावंतांवर धुणी-भांडी करण्याची नामुष्की ओढवली आहे.

जिवंत लोककलेवरच घाला का?

गुरुवारी (ता. ९) चंपाषष्ठीनिमित्त खंडोबा महाराजांचा संपूर्ण महाराष्ट्रात जयघोष करण्यात आला. मात्र, आजपासून सुरू होणारे यात्रोत्सव सलग तिसऱ्या वर्षीही कोरोना निर्बंधांमुळे बंद आहेत. चंपाषष्ठीपासून लोकनाट्य तमाशा मंडळांना सुगीचे दिवस येतात. ठिकठिकाणच्या यात्रोत्सवात तमाशा कलावंत आपली कला सादर करून लोकांचे मनोरंजन करतात. मात्र, कोविडमुळे सलग तिसऱ्या वर्षी तमाशाचे फड बंद आहेत. राज्यात एकीकडे चित्रपटगृहे, जागरण गोंधळ, बॅण्ड पथकांना कोरोना नियमांचे पालन करून परवानगी दिलेली आहे. लावणी महोत्सवही जोरात सुरू आहे, असे असताना लोककलेवरच निर्बंध का, असा प्रश्‍न महाराष्ट्रातील तमाशा कलावंतांनी उपस्थित केला आहे. बंद खोल्यांमध्ये चित्रपटगृहे सुरू आहेत. तमाशाचा फड तर मोकळ्या जागेत भरवला जातो. त्याठिकाणी आलेले रसिक सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून बसू शकतात. असे असताना जिवंत लोककलेवरच घाला का, असा उद्विग्न सवाल कलावंतांनी उपस्थित केला आहे.

tamasha artist
झाडू घेऊन लागली सगळ्यांच्या मागे, राखीची दहशत

जिल्हाधिकाऱ्यांकडून अटकाव

तमाशाचा फड भरविण्यासाठी महाराष्ट्रातील सर्वच जिल्हाधिकाऱ्यांकडून परवानगी मिळत नाही. राज्य सरकारने सर्वच जिल्हाधिकाऱ्यांना तमाशासाठी परवानगी देण्याचे आदेश दिल्यास आमचा व्यवसाय पुन्हा सुरू होईल, अशी अपेक्षाही कलावंतांनी व्यक्त केली.

कलाकारांना रोजगार हमीचाच आधार

लोकनाट्य तमाशाच्या मंचावर उत्कृष्ट कला सादर करणारे कलाकार पोटासाठी रोजगार हमी योजनेच्या कामावर जात आहेत. कुटुंबीयांची पोटाची खळगी भरण्यासाठी पडेल ते काम केले जात आहे. महिला कलाकार धुणी-भांडी करून आपल्या पिल्लांचे पोषण करीत आहे.

''राज्य शासनाचा ‘हम करे सो कायदा’ सुरू आहे. महाराष्ट्रात सर्वच क्षेत्रांना परवानगी असताना सांस्कृतिक वारसा जपणाऱ्या तमाशा कलावंतांवर मात्र कोरोनाच्या नावाखाली निर्बंध लादलेले आहे. ओमिक्रॉन एकही बळी अत्यंत हलाखीच्या परिस्थिती कलावंत आणि फडावर अवलंबून असणाऱ्या हजारो कामगार बेरोजगार झाले आहेत. शासनाने याप्रश्‍नी गांभीर्याने विचार करून तमाशा कलावंतांना परवानगी द्यावी.'' - रघुवीर खेडकर, अध्यक्ष, तमाशा विकास महामंडळ

tamasha artist
'तिचं लग्न झालं तर तू का जळते'?; दीपिका ट्रोल

''राज्य शासनाने तमाशा कलावंतांच्या भविष्याचा विचार करून परवानगी देणे गरजेचे आहे. कोराना नियमांचे पालन करून आम्ही कार्यक्रम करू. राज्यात सर्वकाही सुरळीत असताना जिवंत लोककलेवर निर्बंध लादणे कितपत योग्य आहे. कलावंतांना ५० हजार, दोन लाख रुपयांच्या पॅकेजची घोषणा केली असताना एक रुपयाही मिळालेला नाही. एकीकडे मदतही नाही आणि तमाशा भरविण्यास परवानगीही नाही, याला काय म्हणावे.'' - मंगला बनसोडे, तमाशा कलावंत

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com