‘तौक्ते‘मुळे आदिवासी भागात दाणादाण; घरांसह फळबागांचे अतोनात नुकसान

जिल्ह्यातील सिन्नर, इगतपुरी, सुरगाणा आणि पेठ तालुक्याला तौक्ते चक्रीवादळाचा (tauktae cyclone) फटका बसला आहे.
tauktae cyclone effect
tauktae cyclone effectSakal

सुरगाणा (जि. नाशिक) : जिल्ह्यातील सिन्नर, इगतपुरी, सुरगाणा आणि पेठ तालुक्याला तौक्ते चक्रीवादळाचा (tauktae cyclone) फटका बसला आहे. दिवसभर वादळीवाऱ्यामुळे घरांच्या नुकसानीसह शेती, फळबागा, भाजीपाल्याचे नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. अनेक ठिकाणी वादळाने विजेचे खांब उन्मळून पडल्याने वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार घडले आहेत. एकीकडे कोरोनाने (Coronavirus) आदिवासी भागात हातपाय पसरले तर, दुसरीकडे तोक्ते चक्रीवादळाने अतोनात नुकसान झाल्याने आदिवासी बांधव संकटात सापडला आहे. (tauktae cyclone effect in tribal area surgana nashik News)


अलंगुण येथील नाईकपाडा येथे सोन्या गांगोडे यांच्या इंदिरा आवास घरकुल योजनेच्या घरावरील पूर्ण पत्रे जोरदार वादळाने उडाल्याने हजारोंचे नुकसान झाले आहे. मोलमजुरी करून पिंपळगाव भागात द्राक्ष बागांवर मजुरीला जाऊन डोक्यावर छप्पर उभे केले होते. तेच वादळाने उडवून घेतल्याने डोक्यावरीलच छत्र हरवून घेतल्याने चिंता वाढली आहे. करंजाळी जवळील चिल्हारपाडा येथील धनाजी चौधरी यांच्या घरावरील पत्र्याचे छत वादळाने उडून गेल्याने एक लाख दहा हजारांचे नुकसान झाले आहे. डोळ्या देखत घरावरील पत्रे उडाल्याने जीव मुठीत धरून शेजारी घरात आसरा घेण्याची वेळ आली आहे. त्यातच सायंकाळी सहाच्या सुमारास पावसाच्या हलक्या सरी पडत असल्याने धान्य तसेच संसारोपयोगी वस्तू भिजण्याचा धोका निर्माण झाला आहे.

tauktae cyclone effect
Tauktae : नाशिक जिल्हा यंत्रणेचा सतर्कतेचा इशारा; आपत्तीकालीन स्थितीत 'हे' करा

माणी येथील शेतकरी प्रभाकर महाले यांच्या शेतातील घरावरील पत्रे उडाल्याने नुकसान झाले आहे. साबरदरा येथील गोविंद ठाकरे यांच्या घरावरील छप्पर उडाल्याने घरातील धान्य इतरत्र हलविण्याची वेळ आली आहे. देवलदरी येथील मनोहर पवार यांच्या घरावरील छपराचे आतोनात नुकसान झाले आहे. उंबरठाण येथील प्राथमिक आरोग्य केंद्रावरील पत्रे उडाल्याने वैद्यकीय अधिकारी तसेच परिचारिका यांना जीव मुठीत धरून बाहेर पडावे लागले. पळसन येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारती वरील लोखंडी पत्रे उडाल्याने नुकसान झाले आहे. नैसर्गिक आपती विभागाने पंचनामे करावेत, अशी मागणी नुकसानग्रस्त ग्रामस्थांनी केली आहे.
(tauktae cyclone effect in tribal area surgana nashik News)

tauktae cyclone effect
पिंपळगाव एमआयडीसीत २५ कोटींची उलाढाल ठप्प; ४० कंपन्यांना टाळे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com