esakal | छळाला कंटाळून शिक्षकाने केला आत्महत्येचा प्रयत्न; शिक्षण विभागाच्या कामकाजावर प्रश्‍नचिन्ह
sakal

बोलून बातमी शोधा

teacher

नाशिक : छळाला कंटाळून शिक्षकाने केला आत्महत्येचा प्रयत्न

sakal_logo
By
हर्षवर्धन बोऱ्हाडे

नाशिक रोड : शालार्थच्या फाइलवर चार महिने उलटूनही शिक्षण उपसंचालक स्वाक्षरी करून मंजुरी देत नाही. फाइल प्रलंबित असल्यामुळे काम करूनही संस्थेकडून मोबादला मिळत नाही. कागदपत्रांची पूर्तता करूनही शिक्षण उपसंचालकांकडून फाइल मंजूर न करता त्रास दिला जात आहे. या छळाला कंटाळून भारत बाबुलाल रेशवाल या शिक्षकाने विषारी औषध सेवन करून आत्महत्येचा प्रयत्न केला.

शिक्षण उपसंचालक कार्यालयाच्या कामकाजावर प्रश्‍नचिन्ह

श्री. रेशवाल वरणगाव रोड, भुसावळ येथील रहिवासी असून, जामनेर येथील एकलव्य विद्यालयात शिक्षक आहेत. त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याने शिक्षण उपसंचालक कार्यालय व तेथील कामकाजावर प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे. रेशवाल यांचा हा प्रयत्न वेळीच कुटुंबीयांच्या लक्षात आल्याने त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. भुसावळ येथील बाजारपेठ पोलिसांनी रेशवाल यांचा जबाब नोंदवला आहे. दरम्यान, कागदपत्रांची पूर्तता करूनही शिक्षण उपसंचालकांकडून रेशवाल यांची फाइल कोणत्या कारणाने अडविण्यात आली, हा प्रश्‍न मात्र अनुत्तरितच आहे.

हेही वाचा: मी जन्मदात्री...वैरीण नाही..मृत माताच ठरली गुन्हेगार?

या संदर्भात, रेशवाल यांच्या पत्नी अंकिता यांनी दिलेल्या माहितीनुसार रेशवाल यांचा संबंधित संस्थेशी वाद सुरू होता. त्यामुळे त्यांना शाळेतून काढून टाकण्यात आले होते. तब्बल सात वर्षे कायदेशीर लढा दिल्यानंतर त्यांना न्याय मिळाला. उच्च न्यायालयाने रेशवाल यांना शाळेत पुन्हा रुजू करुन घेण्याचे आदेश दिले. त्यानुसार ११ नोव्हेंबर २०२० ला ते पुन्हा संस्थेत रुजू झाले. त्यानंतर शालार्थ संबंधित सर्व कागदपत्रांची पूर्तता करत त्यांनी स्वतः शिक्षण उपसंचालक नितीन उपासनी यांच्याकडे प्रस्ताव सादर केला. मात्र, चार महिन्यांपासून फाइल पडून आहे. फाइल मंजूर न झाल्यामुळेच त्यांनी हे पाऊल उचलल्याचे सौ. रेशवाल यांनी सांगितले.

दलालांचा सुळसुळाट

शिक्षण उपसंचालक कार्यालयात सध्या शिक्षक दलालांचा मोठ्या प्रमाणात सुळसुळाट झाला आहे. शिक्षक नेतेच दलाल म्हणून विभागातील नाशिकसह धुळे, जळगाव व नंदुरबार जिल्ह्यांत वावरत असून, भ्रष्टाचाराने शिक्षण उपसंचालक कार्यालय पोखरले असल्याचे सामाजिक कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.

हेही वाचा: 8 दिवसापूर्वीच कर्तव्यावर रूजू झाला, पण नियतीने जवान हिरावला

''कागदपत्रांच्या पूर्ततेअभावी संबंधित शिक्षकाचे काम थांबले आहे. या शिक्षकाला बडतर्फ केले होते. आमच्या कार्यालयीन आदेशाने त्यांना पुन्हा सेवेत घेतले आहे. शासनाच्या नियमानुसार आम्ही त्यांची संबंधित कामे करायला तयार आहोत. मात्र, त्यांनी योग्य कागदपत्रांची पूर्तता करावी. पगाराअभावी मानसिक स्वास्थ्य बिघडले, म्हणून त्यांनी हे पाऊल उचलले असावे.'' - नितीन उपासनी, शिक्षण उपसंचालक, नाशिक विभाग

loading image
go to top