ऑनलाइन वर्ग घ्यावे, की कोविडचे काम करावे?

teachers
teacherse sakal

नाशिक : कोविडमुळे (Covid 19) वर्षभरात शाळांना मुकलेल्या विद्यार्थ्यांना यावर्षी शाळांची घंटा वाजेल, अशी अपेक्षा होती. दुसरी लाट व संभावित तिसऱ्या लाटेत लहान मुलांना बाधा होण्याच्या शक्यतेने यावर्षीदेखील शाळांमध्ये जाता आले नाही. परंतु, ऑनलाइन वर्गांना (Online Classes) मंगळवार (ता.१५)पासून सुरवात झाली. असे असले तरी महापालिकेच्या शाळांमधील बहुतांश विद्यार्थी या वर्गांनादेखील मुकले आहे. विभागीय अधिकाऱ्यांनी कोविडच्या कामातून मुक्तता न दिल्याने शिक्षकांना (Teachers) त्यांचे मुळ काम करता आले नाही. (teachers could not take classes as they were not relieved of covid work duty in nashik)

आज पासून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष सुरू झाले. शासनाने ऑनलाइन वर्ग घेण्यास परवानगी दिली आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये म्हणून शाळांना ऑनलाइन वर्गांना सुरवात केली. खासगी शैक्षणिक संस्थांनी पालकांच्या मोबाईलवर लिंक पाठवून शिक्षणाचा श्रीगणेशा केला. मात्र, महापालिकेच्या सर्वच शाळांमधील विद्यार्थ्यांच्या नशिबात शाळेचा आजचा पहिला दिवस नव्हता. महापालिकेने पालिकेच्या ८१ शाळांमधील सर्वच शिक्षकांना कोविडच्या कामात गुंतविले आहे. कोरोनाचा जोर ओसरला तरी पालिकेच्या शिक्षकांची, मात्र कोरोनाच्या कामातून सुटका झालेली नाही. शाळेच्या पहिल्या दिवसापासून विद्यार्थ्यांचे ऑनलाइन शिक्षण घेण्याची विनवणी करण्यात आली, परंतु विभागीय अधिकाऱ्यांनी कोविडच्या कामातून सुटका नसल्याचे संदेश दिले. शिक्षकांनी जमेल तसे ऑनलाइन शिक्षण दिले, परंतु पूर्ण क्षमेतेने ऑनलाइन वर्ग सुरू झाले नाहीत.

(teachers could not take classes as they were not relieved of covid work duty in nashik)

teachers
Unlock Nashik : बांधकाम व्यवसायाला ‘अच्छे दिन’ येणार?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com