Malegaon : सलग चौथ्या दिवशी पारा ४४ अंशावर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

High Temperature

Malegaon : सलग चौथ्या दिवशी पारा ४४ अंशावर

मालेगाव : शहर व परिसरात उन्हाने कात टाकली आहे. गेल्या आठ दिवसांपासून होरपळून निघणारे ऊन पडत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. अक्षयतृतीया व रमजान ईद या सणांची खरेदी नागरिकांना ऊन अंगावर झेलतच करावी लागली. पारा ४४ अंशांच्या वर गेल्याने जिवाची काहिली करणारे ऊन पडत आहे. उन्हामुळे आतापर्यंत दोघांचा मृत्यू झाला आहे. (temperature at 44 degrees for fourth day in row in Malegaon Nashik Temperature News)

अक्षयतृतीया (Akshay tritiya) व रमजान ईद (Ramzan Eid) असे दोन्ही सण एकाच दिवशी साजरे होणाऱ्या मंगळवारी (ता. ३) येथील पारा ४४ अंशांवर होता. मार्चच्या दुसऱ्या आठवड्यापासूनच पारा ४२ अंशांवर होता. दोन महिन्यांपासून येथील तापमान ४२ ते ४४ अंशांदरम्यान असल्याने त्याचा जनजीवनावर मोठा परिणाम झाला आहे. उन्हापासून बचावासाठी बहुतेक नागरिक दिवसभर घरी बसून राहणे पसंत करतात. सायंकाळी पाचनंतरच रस्त्यांवर वर्दळ वाढत आहे. या काळातच सण, उत्सव आल्याने अनेकांना नाइलाजाने उन्हात बाहेर पडावे लागले. मंगळवारी सकाळपासूनच चटके देणारे ऊन पडले होते. दुपारी उन्हाच्या झळा बसत होत्या. दुपारी चारनंतर काही काळ ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने उकाड्याने त्रस्त झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला.

हेही वाचा: आदिमायेच्या दरबारी हापुस आंब्यांची मनमोहक आरास

दृष्टिक्षेपात...

२६ एप्रिल- ४४.०

२७ एप्रिल- ४३.४

२८ एप्रिल- ४३.६

२९ एप्रिल- ४३.६

३० एप्रिल- ४४.४

१ मे- ४४.६

२ मे- ४४.२

३ मे- ४४.०

हेही वाचा: ‘दोन मिनिटांत कर्ज’ पडेल महागात

Web Title: Temperature At 44 Degrees For Fourth Day In Row In Malegaon Nashik Temperature News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top