esakal | ...म्हणून तब्बल दहा हजार वीज ग्राहकांनी महावितरणला पाठविले स्वतःचं मीटर रीडिंग; भुर्दंड टाळण्यासाठी उपाय
sakal

बोलून बातमी शोधा

meter reading.jpg

महावितरण कंपनीच्या मीटर रीडिंगच्या भरवशावर न बसता नाशिक परिमंडलात दहा हजार ८८६ वीज ग्राहकांनी स्वतःच त्यांच्या वीजमीटरचे रीडिंग घेऊन त्याचे छायाचित्र महावितरण ॲपच्या माध्यमातून पाठविले.

...म्हणून तब्बल दहा हजार वीज ग्राहकांनी महावितरणला पाठविले स्वतःचं मीटर रीडिंग; भुर्दंड टाळण्यासाठी उपाय

sakal_logo
By
अंबादास शिंदे

नाशिक रोड : महावितरण कंपनीच्या मीटर रीडिंगच्या भरवशावर न बसता नाशिक परिमंडलात दहा हजार ८८६ वीज ग्राहकांनी स्वतःच त्यांच्या वीजमीटरचे रीडिंग घेऊन त्याचे छायाचित्र महावितरण ॲपच्या माध्यमातून पाठविले. कंपनीकडे नोंदवलेल्या मोबाईल क्रमांकावरून (MAHAVITARAN APP) स्वतः सबमिट करण्याची सोय कंपनीने उपलब्ध केली आहे. त्याचा वापर करीत, वीज ग्राहकांनी स्वतःचे रीडिंग स्वतःच पाठविले. 

वीज ग्राहकांनी पाठविले स्वतःचे रीडिंग स्वतःच
महावितरणच्या ग्राहकांना दरमहा वापरलेल्या विजेचे बिल पाठविले जाते. वीजमीटरवर असलेल्या रीडिंगच्या आधारे बिल पाठविता येते. अनेकदा कंपनीने नेमलेले वीजमीटर घेणारे ठेकेदारांचे लोक येत नाहीत. त्याचा भुर्दंड ग्राहकांना बसतो. बऱ्याचदा कंपनी अशा स्थितीत घाऊक वीजबिल पाठविते. मात्र आता या सगळ्यांवर उपाय म्हणून ग्राहकांना स्वतः त्यांचे मीटर रीडिंग पाठविण्याची सोय उपलब्ध झाली आहे. ॲपद्वारे ग्राहक घरबसल्या आपले मीटर रीडिंग पाठवू शकतात. मात्र ज्या ग्राहकांचे मोबाईल नंबर महावितरणकडे नोंदलेले आहेत, त्यांना रीडिंग सबमिट करण्यासाठी संदेश मिळाल्यापासून पाच दिवसांत रीडिंग पाठविण्याची सोय आहे. 

हेही वाचा > दुर्दैवी! बैलपोळ्याच्या पूर्वसंध्येला अचानक आलेल्या 'त्या' बातमीने ममदापूर हळहळले..काय घडले नेमके?

या सुविधेचा ग्राहकांनी वापर करावा,
यामुळे रीडिंग व वापराबद्दल निश्चितता येऊन दुरुस्तीसाठी महावितरणच्या कार्यालयात जाण्याची गरज भासणार नाही. यासाठी ग्राहकांनी त्यांच्या मोबाईल क्रमांकाची नोंदणी करावी. कुठल्याही तक्रारीसाठी १९१२ या टोल फ्री क्रमांकावर कॉल करता येईल. ग्राहकांना त्यांच्या मीटर रीडिंगचे छायाचित्र ॲपच्या माध्यमातून स्वतःहून सबमिट करण्याची सोय आहे. ग्राहकांना वास्तविक वापराचे व अचूक वीजबिल देण्यास मदत होईल. या सुविधेचा ग्राहकांनी वापर करावा, असे आवाहन महावितरणने केले आहे.  

हेही वाचा > धाबे दणाणले! नियुक्ती होऊनही उमेदवार कामावर नाही?कारवाई तर होणारच

संपादन - ज्योती देवरे

loading image
go to top