Eknath Shinde : निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटाची नाशिकमध्ये मोठी खेळी!

वंचितला महाविकास आघाडीत घेण्यासाठी इतर पक्षांची हरकत असल्याच्या प्रश्नावर शरद पवारांनी दिलं स्पष्टीकरण
Eknath Shinde
Eknath ShindeEsakal

गेल्या काही दिवसांपासुन नाशिकमधील राजकारणात मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. काही दिवसांपुर्वी शिवसेनेच्या ठाकरे गटाला खिंडार पडलं. ठाकरे गटातील गळती रोखण्यासाठी खासदार संजय राऊत यांनी नाशिकचा दोनवेळा दौरा केला. तर काल भाजपचे अद्वय हिरे यांनी शिवसेनेच्या ठाकरे गटात प्रवेश केला आहे. त्यामुळे हा पक्षप्रवेश भाजपसह शिंदे गटाला मोठा धक्का मानला जात आहे.

तसेच अद्वय हिरे याच्या पक्षप्रवेशामुळे ठाकरे गटाची ताकद वाढल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. अद्वय हिरे यांनी शिंदे गटाचे दादा भुसे यांच्या विरोधात दंड थोपटले आहेत. हिरे यांनी काल पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, संजय राऊत आणि विनायक राऊत यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला.

Eknath Shinde
Sharad Pawar : सर्वेक्षणात मविआला महाराष्ट्रात भरघोस यश; पवार म्हणाले, सत्ताधाऱ्यांना...

अशातच आगामी महानगरपालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसह स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकाच्या पार्श्वभुमीवर शिंदे गटाने एक विशेष समिती स्थापन केली आहे. त्यामध्ये एकूण आठ सदस्य असणार आहे. आठपैकी सात सदस्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नाशिकमधील संपर्कप्रमुख पदाची नियुक्ती झालेली नसल्याने एक पद रिक्त ठेवण्यात आले आहे. निवडणुकीचे चित्र स्पष्ट नसले तरी शिंदे गटाच्या माध्यमातून निवडणुकीच्या बाबतीतील सर्वच निर्णय हे नाशिकमधील आठ जणांची समिती घेणार आहे. नाशिक महानगर पालिकेच्या निवडणुकीत शिंदे गटही आपली ताकत दाखविण्यासाठी प्रयत्न करत आहे.

Eknath Shinde
Santosh Bangar : संतोष बांगर यांच्या अडचणीत वाढ! 'या' प्रकरणात गुन्हा दाखल

नाशिकसाठी निवडण्यात आलेल्या आठ सदस्यांच्या समितीमध्ये एकुण सात नावं निश्चित करण्यात आली आहेत. आठ सदस्यांच्या समितीमध्ये भाऊसाहेब चौधरी, दादा भुसे, हेमंत गोडसे, सुहास कांदे, अजय बोरस्ते, प्रवीण तिदमे आणि राजू लवटे यां नावांचा समावेश करण्यात आला आहे.

तर भाऊसाहेब चौधरी यांच्याकडे बाळासाहेबांची शिवसेनेचे सचिव पद आहे, दादा भुसे हे नाशिकचे पालकमंत्री आहेत, तर हेमंत गोडसे नाशिकचे खासदार आहे. सुहास कांदे आमदार आहेत, अजय बोरस्ते जिल्हाप्रमुख आहे, तर प्रवीण तिदमे हे महानगरप्रमुख असून राजू लवटे हे सहसंपर्कप्रमुख पदी आहे. निवडणुकीच्या तारीख निश्चीत नसताना शिंदे गटाने आधिच पूर्वतयारी सुरू केली असून विशेष समिती स्थापण केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com