Nashik Crime: चांदवड शहरात एकाच रात्री 6 दुकानांमध्ये चोरी | Theft in 6 shops in one night in Chandwad city Nashik Crime | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

crime

Nashik Crime: चांदवड शहरात एकाच रात्री 6 दुकानांमध्ये चोरी

Nashik Crime : चांदवड शहरातील मेनरोडवर चोरट्यांनी एकाच रात्री सहा दुकानांसह एक घर फोडत चोरट्यांनी ४५ हजार १७० रुपयांचा ऐवज चोरुन नेला. एकाच रात्री सहा दुकाने फोडल्याने व्यापाऱ्यांमध्ये भितीचे वातावरण आहे. (Theft in 6 shops in one night in Chandwad city Nashik Crime)

शनिवार (ता.२७) मध्यरात्री हा प्रकार घडला. शनिवारी मध्यरात्री चोरट्यांनी मेनरोडवरील रेणुका कलर, झांबरे पैठणी, गौतम किराणा एजन्सी, श्री स्वामी समर्थ कृषी सेवा केंद्र, इंदुमती बहुउद्देशीय सेवाभावी सहकारी संस्था, जाधव आणि कंपनी, ॲग्रो मॉल या दुकानांसह साहेबराव गुंजाळ यांचे घर फोडले.

यावेळी शंतनू झालटे यांच्या रेणुका कलर दुकानातील गल्ल्यातील २५ हजार रुपयांची रोकड तर संजय शेळके यांच्या श्री स्वामी समर्थ कृषी दुकानातील गल्ल्यातील तीन हजार वीस रुपये, सागर जाधव यांच्या दुकानातील सहा हजार सातशे ७०० रुपये, इंदुमती बहुउद्देशीय संस्थेच्या रासायनिक खत विक्री केंद्र दुकानातील रोख रक्कम,

तर साहेबराव गुंजाळ यांच्या घरातून ८ हजार चारशे रुपये किमतीचा मोबाईल असा एकूण ४५ हजार १७० रुपयांचा ऐवज चोरट्याने चोरुन नेला. याप्रकरणी चांदवड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.