Nashik Crime News : दिक्षीत काळी द्राक्षांच्या वाणाची चोरी; टोळी सक्रिय असण्याची शक्यता

Jalinder Chowgule, Balasaheb Chowdhary, Sachin Chowdhary etc. of the police station during the inspection after the theft of grapes from the farm of Balasaheb Baburao Chowdhary.
Jalinder Chowgule, Balasaheb Chowdhary, Sachin Chowdhary etc. of the police station during the inspection after the theft of grapes from the farm of Balasaheb Baburao Chowdhary.esakal

ओझर (जि. नाशिक) : दिक्षी (ता. निफाड) येथील जनार्दन स्वामी रोडवरील बाळासाहेब बाबूराव चौधरी यांच्या गट नं ९८ दिक्षी शिवारात असलेल्या चालू हंगामात तयार झालेल्या पर्पल (काळी द्राक्ष) वाणाची मध्य रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी डल्ला मारला.

त्यात सुमारे पाऊण लाखांचे द्राक्ष चोरीला गेले आहेत. परिसरात मोठी टोळी असण्याची शक्यता असल्याने द्राक्ष बागायतदारांवर रात्रीचा पहारा करण्याची वेळ आल्याने बागायतदार धास्तावले आहेत. (Theft of Dixit black grape variety crop gang being active Nashik Crime News)

बुधवारी (ता. २९) च्या मध्यरात्रीनंतर दिक्षी विकास संस्थेचे माजी सभापती बाळासाहेब चौधरी यांच्या काढणीला आलेल्या तसेच बागाचा विक्री सौदाही झालेल्या पर्पल द्राक्ष वाणाच्या (काळी) द्राक्षवेलींच्या सुमारे तेरा गल्यांतील १५ ते १६ झाडांवरील एक्स्पोर्ट दर्जाच्या द्राक्षांचे घड सुमारे चाळीस ते पन्नास कॅरेट अंदाजे पाऊण लाख रुपये किमतीचा माल चोरट्यांनी चोरून नेला. सध्या सदर बागेतील द्राक्षांच्या विक्रीचा सौदाही झाला होता. व्यापाऱ्याला सत्तर रुपये किलोने द्राक्ष विक्री करावयाचे होते.

चोरट्यांनी आधी त्यांच्या मळ्या शेजारीच राहणारे शेतकरी राजाराम संपत चौधरी यांच्या गोदामामधून पंचवीस कॅरेटची चोरी केली असल्याची माहिती या वेळी मिळाली. एका कॅरेटची चोरी तर दुसऱ्याचे द्राक्ष अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले याबाबत चौधरी यांनी ओझर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

हेही वाचा : जीएसटीसाठी नोंदणी केलीच नाही तर??

Jalinder Chowgule, Balasaheb Chowdhary, Sachin Chowdhary etc. of the police station during the inspection after the theft of grapes from the farm of Balasaheb Baburao Chowdhary.
Ajit Pawar | जिद्द असेल तर कोणतेही काम शक्य : अजित पवार

दोन वर्षापूर्वीही अज्ञात चोरट्यांनी अशीच परिसरात द्राक्षांवर डल्ला मारला होता. परंतु, पोलिसांनी चोरट्यांना तपासात पकडून चांगलाच चोप दिला होता. परिसरात टोळी सक्रिय असण्याची शक्यता शेतकऱ्यांनी वर्तवली आहे.

"अस्मानी सुलतानीमुळे बळीराजा कर्जबाजारी झाला असून आता हातातोंडाशी आलेला घास त्यावरही चोरट्यांचा डोळा अशी परिस्थिती आहे. शेतकऱ्याने आता बांधावरही सीसीटीव्ही लावावे का असा प्रश्न आहे. बळीराजावर असे संकटे आली तर मोठ्या आशेने बागांवर काढलेले कर्ज भरावे तरी कसे." - बाळासाहेब चौधरी, माजी सोसायटी सभापती, दिक्षी

Jalinder Chowgule, Balasaheb Chowdhary, Sachin Chowdhary etc. of the police station during the inspection after the theft of grapes from the farm of Balasaheb Baburao Chowdhary.
Market Committee Election: स्थगिती हटविल्याने ‘त्या’ 78 संचालकांची नावे वगळणार! पुढील सुनावणी 10 एप्रिलला

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com