RTE Admission : ‘आरटीई’ प्रवेशात सटाण्यात अफरातफर?

RTE 25 percent admission announced on Wednesday education pune
RTE 25 percent admission announced on Wednesday education punesakal

Nashik News : बागलाण तालुक्यात काही नामांकित इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये आरटीई योजनेतंर्गत आर्थिक दुर्बल घटकातील पाल्यांना दिल्या जाणाऱ्या प्रवेश प्रक्रियेत मोठी अफरातफर झाली असल्याचे उघडकीस आले आहे. (there has been big mess in admission process given to children from economically weaker sections under RTE scheme in schools nashik news)

यात योजनेच्या उद्देशालाच हरताळ फासले गेल्याचा आरोप पालकांनी केला आहे. खऱ्या लाभार्थ्यांना लाभ झाला नसल्याने नव्याने प्रक्रिया राबविण्याची मागणी होत आहे.

राज्यात दरवर्षी आरटीई अंतर्गत लॉटरी पद्धतीने विद्यार्थ्यांची निवड केली जाते. शिक्षण विभागाने तालुकास्तरावर गठित केलेल्या निवड समितीतील सदस्यांनीच सटाणा तालुक्यात प्रवेश प्रक्रियेत गैरप्रकार करत शहराच्या हद्दीत असलेले आणि बनावट कागदपत्रे बनवून ग्रामपंचायतीमधील रहिवासी आणि उत्पन्नाचा दाखला मिळवीत प्रवेश मिळविला मूळ लाभार्थ्यांना प्रवेशापासून वंचित ठेवला असल्याचा आरोप पालकांनी केला आहे.

खरे आर्थिक दृष्ट्या मागास विद्यार्थी वंचित राहिल्याने समितीची जबाबदारी व कार्यपद्धतीवर आक्षेप घेत ही प्रक्रिया रद्द करण्याची मागणी पालकांनी केली आहे.

सटाणा शहरालगत असलेल्या ग्रामपंचायत हद्दीतील काही नामांकित इंग्लिश मीडियम स्कूलच्या आरटीई अंतर्गत प्रवेश पात्र विद्यार्थ्यांच्या यादीत शहरातील विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, प्रसिद्ध व्यापारी, ठेकेदार, प्राध्यापक,माध्यमिक व प्राथमिक शिक्षकांच्या मुलांचे लॉटरी पद्धतीने झालेल्या निवड यादीत समावेश आहे.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

RTE 25 percent admission announced on Wednesday education pune
Nashik News: मालेगाव बसस्थानकाची झाली दुरवस्था; संरक्षण भिंतीची पडझड, बदलत्या काळानुसार सुविधांची गरज

या सर्वांनी आरटीई अंतर्गत प्रवेशासाठी पिंपळदर, दऱ्हाणे, आराई, मुंजवाड, मळगाव, मोरेनगर आदी गावातील रहिवासी असल्याचे दाखवून आणि प्रवेशासाठी इतर बनावट कागदपत्रक सादर करून आरटीई अंतर्गत आवेदन पत्र भरले आहेत. त्यामुळे खरे लाभार्थी विद्यार्थी या प्रवेशापासून वंचित राहिले आहेत.

या सर्वांनी ऑनलाइन आवेदन भरताना आपला तात्पुरता निवासी पत्ता बदलून, उत्पन्नाचे बनावट दाखले देऊन आवेदन पत्र भरलेले आहे. या सर्वांवर बनावट, खोटे कागदपत्रक सादर करून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करावेत अशी मागणीही प्रवेशापासून वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी केली आहे.

"आरटीई प्रवेश पात्र यादीतील त्या विद्यार्थ्यांनी ऑनलाइन सादर केलेल्या कागदपत्रांचे पुरावे, स्थानिक रहिवासी दाखला, आठ ड चा उतारा, ग्रामपंचायत हद्दीत राहत असल्यास घरपट्टी, शेतात वास्तव्यास असतील तर सातबारा उतारा यांची पडताळणी करूनच प्रवेश दिला जाईल. पडताळणी बाबत गटविकास अधिकाऱ्यांनी याबाबत संबंधित निवड समितीस सूचना दिल्या आहेत." - चित्रा देवरे, गटशिक्षणाधिकारी पं. स. बागलाण

RTE 25 percent admission announced on Wednesday education pune
Nashik News : नामपूरच्या स्वस्त धान्य दुकानाचा परवाना निलंबित; नियमानुसार धान्य वितरण न करणे भावले

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com