Nashik Crime: पोलिसांच्या घरातच चोरट्यांचा डल्ला! अंगणगाव वसाहतीत बंद घर फोडून चोरी | Thieves in house of police Theft by breaking into closed house in Angangaon Colony Nashik Crime | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

yeola police headquarters

Nashik Crime: पोलिसांच्या घरातच चोरट्यांचा डल्ला! अंगणगाव वसाहतीत बंद घर फोडून चोरी

Nashik Crime : मोटरसायकल चोरी, घरफोड्या, चेन स्नॅचिंग यासारख्या घटना येवलेकरांना नवीन नाहीत; पण शहरालगत अंगणगाव येथील भव्यदिव्य अशा पोलीस वसाहतीतील एका कर्मचाऱ्याच्याच घरात चोरट्यांनी ६१ हजारांचा डल्ला मारला आहे.

ही घटना संपूर्ण तालुक्यात चर्चेचा विषय बनली आहे. (Thieves in house of police Theft by breaking into closed house in Angangaon Colony Nashik Crime)

शहर व तालुक्यात भुरट्या चोरट्यांनी डोकेवर काढले आहे. उन्हाळ्यात अनेक जण सुट्ट्यांमुळे बाहेरगावी जातात. ही संधी साधून चोरटे शहरात घरफोड्या करतातच, हेही आता नित्याचेच झाले आहे.

गवंडगाव, चिचोंडीपाठोपाठ आता येवला शहरात अंगणगाव येथील पोलीस वसाहतीपर्यंत हे लोण पसरले आहे. येथील पोलीस वसाहतीत बिल्डिंग क्रमांक दोनमध्ये वरच्या मजल्यावर एका महिला पोलीस कर्मचाऱ्यांच्या घरी गेल्या मंगळवारी (ता. २३) सायंकाळी सहाच्या सुमारास हा प्रकार घडला.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

संबंधीत महिला कर्मचारी बाहेरगावी गेलेल्या असताना चोरट्यांनी बंद घर फोडून चोरी केली. यात सोन्या चांदीचे दागिने, रोख रक्कम व लहान मुलांच्या गल्ल्यातील सात ते आठ हजार रुपये असा एकुण ६१ हजार पाचशे रुपयांचा ऐवज चोरट्याने चोरून नेला.

इतर अनेक छोट्या-मोठ्या प्रकरणांत चोरट्यांना पकडण्यात पोलिसांना अनेकदा अपयश येते. त्यामुळे आता या चोरट्याला पकडण्याचे आव्हान पोलिसांपुढे आहे.

दरम्यान, या घटनेची माहिती पोलीस उपविभागीय अधिकारी समीरसिंह साळवे यांना समजतात त्यांनी तातडीने घटनास्थळी भेट देत पाहणी केली. पोलीस निरीक्षक नंदकुमार कदम यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.