
Unseasonal Rain : अवकाळी पावसाचे सलग तिसऱ्या दिवशी शेतकरी राजावर आसमानी संकट
विकास गिते
सिन्नर (जि. नाशिक) : सिन्नर तालुक्यातील पश्चिम भागात सुमारे अर्धा ते एक तास पावसाचा हाहाकार, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागात बुधवार, गुरुवार व शुक्रवारी अवकाळी पावसाने विजांसह पावसाने धुडगूस घातल्याने.
सिन्नर तालुक्यात विशेष करून पश्चिम भागातील कोनांबे सोनांबे यास अनेक परिसरात शुक्रवारी साडेतीन वाजता दुपारी अनेक ठिकाणी पावसाने तडाखा दिल्याने शेतकरी राजावर मोठे संकट ओढवले आहेत. (Third consecutive day of unseasonal rain crisis on farmer nashik news)
मध्य महाराष्ट्र ,मराठवाड्यात गारपिटाचा ऑरेंज अलर्ट हवामान खात्याने अंदाज दिल्याने बुधवार, गुरुवार फक्त शुक्रवारी पावसाने अनेक ठिकाणी हजेरी लावल्याने शेती पिकांवर मोठे संकट निर्माण झाले आहेत.
काढणीस आलेला गहू, हरभरा ,कांदा पिकांचे शुक्रवारी झालेल्या पावसात मोठे नुकसान झाले असून. गुरुवारी मध्यरात्रीपासून विजांसह गारपिटाचा पाऊस. त्यात पहाटे ढगाळ वातावरण यामुळे अनेक नागरिकांनी या वातावरणाची धास्ती घेतली आहे.
जिल्ह्यात अनेक भागात गहू सोंगणीला आलेला असताना हाती तोंडी आलेला घास या अवकाळी पावसाने हिरावून घेतलेला आहे. तर उन्हाळ कांद्याची काढणी सुरू झाली .असून या पावसाचा या कांद्यालाही मोठा फटका बसलेला आहे. गहू, हरभरा, मका, हे सोगणीला आलेले पीक पावसात भिजल्याने खूप मोठे नुकसान झाल्याचे दिसत आहे.
सिन्नर तालुक्यात अनेक ठिकाणी विजेच्या कडकड्यांचा वादळ तसेच काही ठिकाणी गारांचा पाऊस पडल्याने शेतकरी राजा शेत जमिनीमध्ये असलेल्या पिकाकडे धाव घेऊन कांदा, गहू हे पीक झाकण्यासाठी धावपळ करताना दिसत आहे.
त्यातच द्राक्ष उत्पादकांमध्ये या गारपिटांनी मोठी चिंता वाढवली असून हाती तोंडाशी आलेला घास या गाराच्या अवकाळी पावसामुळे जातो का काय अशी स्थिती शेतकरी वर्गात निर्माण झाली आहे.
हेही वाचा : ही चाळीस वर्षे जुनी बलाढ्य बँक ४८ तासात बुडालीच कशी?
त्यातच ढगाळ वातावरण असल्याने शेतकरी उत्पादक मोठ्या चिंतेत असून मागील सहा ते सात महिन्यापूर्वी अवकाळी पावसाने जिल्हाभर थैमान घातल्याने व होत्याचे नव्हते झालेले होते. तातडीने पिकांचे पंचनामे करा आमदार माणिकराव कोकाटे यांचे संबंधित विभागाला सूचना शासनाने त्वरित या नुकसानीचे पंचनामे करावेत.
अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे. सिन्नरचे आमदार माणिकराव कोकाटे यांनी संबंधित विभागाला सूचना देत अवकाळी पावसाचे पंचनामे करण्याचे आदेश दिलेले असून शुक्रवारी मुंबई येथील अधिवेशनात राज्यात झालेल्या अवकाळी पावसाळ्यामुळे अनेक ठिकाणी शेतकरी राजाचे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले असून लवकरात लवकर शेतकरी राजाला मदत करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस आमदारांनी केली आहे.
मागील पाच-सहा दिवसापूर्वी अवकाळी पाऊस सिन्नर तालुक्यात पडल्याने अनेक ठिकाणी गहू, हरभरा, मका, द्राक्ष यांचे नुकसान झाल्याने 75 हेक्टरवर नुकसानीचे पंचनामे कृषी ,महसूल या संबंधित विभागाने तालुक्यात केलेले आहेत.
"सिन्नर तालुक्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने अक्षरशा दाणाफान करून सुमारे एक तास विजांसह पावसाने जोरदार हजेरी लावल्याने शेतामधील पिकांचे नुकसान झाले आहे ठाणगाव कोनांबे सोनांबे सोनारी लोणारवाडी आदी परिसरात शुक्रवारी दुपारी तीन वाजेच्या पुढे पावसाने सुरुवात केल्याने अक्षरशा सर्व शेतांमधून पाणी वाहत होते या अवकाळी पावसामुळे हाती आलेला घास हिरावून घेतल्याचे दृश्य तालुक्यात दिसत आहे लवकरात लवकर आसमानी संकटामुळे नुकसानीचे पंचनामे करावे." - माणिकराव कोकाटे, आमदार
"अवकाळी पाऊस शेतक-यांची पाठ सोडत नसल्याचे चित्र आहे. नाशिक जिल्ह्यातील अनेक तालुक्यांत बुधवारी ,गुरुवार तसेच शुक्रवार विजांचा कडकडाट अन् ढगांच्या गडगडाटासह पावसाने दमदार हजेरी लावली. दोन्ही दिवस ढगाळ वातावरण कायम होते. द्राक्षांबरोबरच कांदा, गहू, हरभरा, आंबा आणि भाजीपाल्याचेही या पावसाने नुकसान झाले आहे. अवकाळी पावसाच्या आपत्तीने आधीच घायकुतीला आलेल्या शेतकरी या नव्या आपत्तीने पुरता खचला आहे. त्याच्या हाता-तोंडाशी आलेला घास डोळ्यांदेखत हिरावला जात आहे."
- अण्णासाहेब सूर्यभान गडाख, अध्यक्ष, माध्यमिक लोकशिक्षण मंडळ सिन्नर