Crime: इगतपुरीतील डेव्हीड गँगचा तिसरा सदस्यही जाळ्यात; मोक्का प्रकरणातील फरारींवर दोनच दिवसात मोठी कारवाई | Third member of David Gang caight in Igatpuri Big action against fugitives in Mokka case in two days nashik crime news | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

arrested

Crime: इगतपुरीतील डेव्हीड गँगचा तिसरा सदस्यही जाळ्यात; मोक्का प्रकरणातील फरारींवर दोनच दिवसात मोठी कारवाई

Crime : खुनाच्या गुन्ह्यातील इगतपुरी शहरातील कुख्यात डेव्हीड गँगच्या तिसऱ्या आरोपीला पकडण्यात पोलिसांना रविवारी (ता. १४) यश आले. डेविड गँगवरील मोक्का केसमधील आणखी एका गुन्हेगाराला पोलिसांनी रविवारी (ता. १४) दुपारी नाशिकमधून ताब्यात घेतले आहे.

अजय राजू पवार उर्फ अजय टाकल्या (वय २३) असे त्याचे नाव आहे. (Third member of David Gang caight in Igatpuri Big action against fugitives in Mokka case in two days nashik crime news)

डिसेंबर २०२०मध्ये डेव्हीड गँगच्या तिघांनी संजय बबन धामणे (रा. सुमंगल रेसिडन्सी, डाक बंगला, इगतपुरी) यास तीक्ष्ण हत्याराने पोटावर, छातीवर, तोंडावर मारहाण करून ठार मारले होते. तसेच, ऑगस्ट २०२२मध्येही त्यांनी झाकीया मेहमुद शेख (रा. गायकवाडनगर) या महीलेवर धारदार चाकूने वार करून तिचा निर्घृण खून केला होता.

तेव्हापासुन तिघेही फरारी होते. शुक्रवारी (ता. १२) विक्रोळी मुंबई येथे मध्यरात्री छापा टाकून कुख्यात गुन्हेगार जॉन पॅट्रीक मॅनवेल उर्फ छोटा पापा (वय २२) व अजय पॅट्रीक मॅनवेल उर्फ आज्या (वय २७, दोघे रा. गायकवाडनगर, इगतपुरी, हल्ली हरीयाली व्हिलेज, गणेश चाळ, विक्रोळी पुर्व, मुंबई) या दोघांना पोलीसांनी शिताफीने ताब्यात घेतले होते.

शहरातील सर्वसामान्य नागरीक, तसेच रेल्वे स्टेशन परिसरातील स्टॉलधारक, व्यावसायिकांमध्ये डेव्हीड गँगच्या धाक-दडपशाहीमुळे दहशहतीचे वातावरण निर्माण झालेले होते. या गुन्हेगारांवर पोलीस ठाण्यासह, इगतपुरी रेल्वे, कल्याण रेल्वे पोलीस ठाण्यांत खून, खूनाचा प्रयत्न, दरोडा, जबरी लुटमार, चोरी, गंभीर दुखापत, भारतीय हत्यार कायदा असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

पोलीस अधीक्षक शहाजी उमाप, अपर पोलीस अधीक्षक माधुरी केदार-कांगणे, उपविभागीय पोलीस अधिकारी अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राजु सुर्वे, विशेष पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास ढोकरे, पोलिस हवालदार दीपक आहीरे, किशोर खराटे,

गोरक्षनाथ संवस्तरकर, पोलिस कॉन्स्टेबल गिरीष बागुल, विनोद टिळे, पोलिस नाईक हेमंत गिलबिले, प्रदिप बहीरम, हवलदार सचिन देसले, मुकेश महिरे, कॉन्स्टेबल अभिजित पोटींदे यांच्या पथकाने सापळा रचुन ही कारवाई केली.