नोव्हेंबरपासून उडणार लग्नाचे बार!

wedding ceremonies
wedding ceremoniesSakal


पिंपळगाव बसवंत (नाशिक) : पुढील महिन्यात तुलसी विवाहानंतर इच्छुक वधू-वरांच्या लगीनघाईला सुरवात होणार आहे. यंदा २० नोव्हेंबरपासून सनई चौघडे वाजण्यास सुरवात होऊन ९ जुलै २०२२पर्यंत लग्न सोहळे पार पडणार आहेत. यंदा कर्तव्य असणाऱ्यांसाठी तब्बल ६३ मुहूर्त असून, विवाहासाठी पालकांना सोयीनुसार मुहूर्त ठरविता येणार आहे.

१५ ते १९ नोव्हेंबरदरम्यान तुलसी विवाह होताच लग्नसमांरभला सुरवात होईल. गतवर्षी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मर्यादित व्यक्तींच्या उपस्थितीत मोजकेच विवाह पार पडले. कोरोनाचा प्रादूर्भाव ओसरल्याने यंदा मात्र विवाहाची सनई र्निविघ्न पार पडणार आहे. यंदा नोव्हेंबरमध्ये चार, डिसेंबरमध्ये ११, जानेवारीत पाच, फेब्रुवारीत सहा, मार्चमध्ये चार, एप्रिलमध्ये सहा, मेमध्ये ११, जूनमध्ये दहा व जुलैत सहा विवाह मुहूर्त आहेत. यंदा नोव्हेंबर व मार्चमध्ये सर्वांत कमी चार विवाह तिथी आहेत. वेगवेगळ्या पंचांगानुसार मुहूर्त कमी- अधिक होतात. अनेक जण आतापासूनच तयारीला लागले आहेत. वधू-वरांची पसंती झाल्यानंतर मंगल कार्यालये, केटरर्स, डेकोरेशन बुकींग करीत आहेत. सध्या मुला-मुलीच्या पसंतीच्या कार्यक्रम सुरू असून, मध्यस्थामार्फत सोयरीक जुळविली जात आहे. मानपान, आहेर, मंगल कार्यालय, पत्रिका, आचारी, वाहनांची बुकिंगही सुरू झाली आहे. अवघ्या महिनाभरावर यंदाचा पहिला मुहूर्त असल्याने बाजारपेठेत सध्या लग्नाच्या खरेदीसाठी गर्दी होऊ लागली आहे. यामुळे दिवाळीनंतर बाजारपेठेत पुन्हा गर्दी पाहायला मिळणार आहे.

wedding ceremonies
दिवाळी नंतर कोरोनाची तिसरी लाट? राजेश टोपेंचे विधान

यंदाचे लग्नाचे मुहूर्त असे : नोव्हेंबर २०२१- २०, २१, २९, ३०, डिसेंबर-१, ७, ८, ९, १३, १९, २४, २६, २७, २८, २९, जानेवारी २०२२- २०, २२, २३, २७, २९, फेब्रुवारी-५, ६, ७, १०, १७, १९, मार्च-२६, २६, २७, २८, एप्रिल-१५, १७, १९, २१, २४, २५, मे- ४, १०, १३, १४, १८, २०, २१, २२, २५, २६, २७, जून- १, ६, ८, ११, १३, १४, १५, १६, १८, २२, जुलै- ३, ५, ६, ७, ८, ९.


यंदा दिवाळीनंतर म्हणजेच नोव्हेंबरपासून लग्नसराईला सुरवात होईल. कोरोनाचे सावट दूर झाले असले, तरी नागरिक आर्थिक अडचणीत असल्याने पूर्वीप्रमाणे धुमधडाक्यात विवाह होण्याची शक्यता कमी आहे. ९ जुलैपर्यंत लग्नाचे ६३ मुहूर्त असून, पालकांना अधिक पर्याय उपलब्ध आहेत.
-किशोर दीक्षित, भटजी, पिंपळगाव बसवंत

wedding ceremonies
'मी साहेबाला हजारो रुपये आणून देतो!' दोन पोलिसांची ऑडिओ क्लिप व्हायरल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com