Nashik : गुरुपौर्णिमेनिमित्त हजारो भाविक सप्तश्रृंगीचरणी लीन | Latest marathi News | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Saptashrungi Devi Temple Wani latest marathi news

Nashik : गुरुपौर्णिमेनिमित्त हजारो भाविक सप्तश्रृंगीचरणी लीन

वणी (जि. नाशिक) : 'अंबे माते की जय, व आदिमाया सप्तश्रृंगी माते की जय' चा घोष करीत गुरु पौर्णिमॆनिमित्त हजारो भाविकांनी वरुणराजाच्या सतंतधारेत चिंब होत सप्तश्रृंगीचरणी (Saptashrungi devi temple) लीन झाले. (Thousands of devotees darshan in Saptashrungi ttemple for Gurupournima nashik Latest marathi News)

सहा दिवसांपासून सप्तश्रृंगी गडावरावर जोरदार होणारी पर्जन्यवृष्टी , दाट धुकेे, सर्वत्र हिरवळ, कड्या कपाऱ्यातून उडणारे पाण्याचे फवारे अशा निसर्गरम्य वातावरणात आज गुरु पौर्णिमेनिमित्त भाविकांनी आदिमायेच्या दर्शनासाठी हजेरी लावली.

सकाळी आठ वाजता न्यासाच्या कार्यालयापासून देवीच्या आभुषने, सोन्याचा मुकुट, पाऊलांची सवाद्य मिरवणुक काढण्यात आली. दरम्यान आदिमाया भगवतीची पंचामृत महापूजेसाठी भाविक उपस्थित होते.

त्यानंतर दोन दिवसांपूर्वी मंदीराच्या परतीच्या पायरी मार्गावर डोंगरावरुन आलेल्या पाण्याबरोबर दगड मातीचा मलबा वाहून आल्याने पाच भाविक किरकोर जखमी झाले होते. झालेल्या घटनेची गडावर ढगफुटीची अफवा सोशल मिडीयाच्या माध्यमातून गेल्याने तसेच जिल्हृासह ठिकठिकाणी होत असलेल्या पर्जन्यवृष्टीमूळे भाविकांच्या गर्दीवर मोठा परिणाम झाला होता.

दिंडोरी येथील स्वामी समर्थ गुरुकुल पीठात गुरु पोर्णिमा उत्सव संपन्न झाल्यानंतर शेकडो सेवेकऱ्यांनी गडावर हजेरी लावून देवीचेे दर्शन घेतले. दरम्यान गडावरील गुरुदेव आश्रमातही गुरु पोर्णिमा उत्सव साजरा करण्यात आला.

हेही वाचा: समृद्धी बाधित रस्त्यांची दुर्दशा दोन दिवसात संपवा : माणिकराव कोकाटे

यावेळी आश्रमातर्फे भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. तसेच येथील जगदंबा माता मंदीर, मार्कंडेय पर्वतावर मार्कंडेय ऋषी मंदीर, पारेगांव येथील पाराशरी आश्रम, करंजी, कृष्णगांव येथील दत्त मंदीरातही गुरु पोर्णिमे निमित्त अभिषेक, पंचामृत महापुजा आदी धार्मिक कार्यक्रम संपन्न होवून येथेही हाजारो भाविकांनी दर्शन व महाप्रसादाचा लाभ घेतला.

२० जुन पर्यंत आदिमायेचे मंदीर नियमित पणे सुरु राहाणार असून त्यानंतर मुर्तीच्या देखभाल व मंदीर गाभाऱ्याची डागदुजी व सजावटीसाठी आदिमायेचे फक्त मंदीर २१ जुन पासून दीड महिना बंद असणार आहे.

मात्र भाविकांना पर्यायी दर्शनासाठी पहिल्या पायरीवर व्यवस्था करण्यात येणार असून ट्रस्टच्या सर्व सुविधा नेहमी प्रमाणे भाविकांना उपलब्ध असणार आहे. तरी भाविकांनी कुठल्याही अफवेवर विश्वास ठेवू नये असे सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्टच्या विश्वस्त मंडळाने केले आहे

हेही वाचा: Latest Marathi News : सांडपाण्यातच संसार थाटण्याची वेळ; गटारीचे पाणी घरात

Web Title: Thousands Of Devotees Darshan In Saptashrungi Ttemple For Gurupournima Nashik Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top