esakal | भाजप पदाधिकारीकडून पत्रकाराला धमकावल्याचा धक्कादायक प्रकार! काय घडले नेमके?
sakal

बोलून बातमी शोधा

journalist.jpg

"आयजीच्या जिवावर बायजी उदार' या मथळ्याखाली बातमी ऑनलाइन प्रसिद्ध केली. यानंतर नगरसेविकेचे पती व भाजप पदाधिकारी यांनी संबंधित पत्रकार यांच्याशी संपर्क करून त्यांना मोबाईलवर ठार करण्याची धमकी दिली. त्याचबरोबर, "तू सिडकोत दिसलास, तर मी तुझ्याकडे बघतो', असा दम देऊन शिवीगाळ केली. हा प्रकार घडल्यानंतर पत्रकाराने पोलिसांत तक्रार दाखल केली.

भाजप पदाधिकारीकडून पत्रकाराला धमकावल्याचा धक्कादायक प्रकार! काय घडले नेमके?

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नाशिक : ऑनलाइन बातमी प्रसिद्ध केल्याचा राग येऊन पत्रकार प्रमोद दंडगव्हाळ यांना धमकी दिल्याप्रकरणी भाजप नगरसेविकेचे पती, तसेच भाजप पदाधिकारी कैलास आहिरे यांच्याविरोधात ठार करण्याची धमकी दिल्याचा अंबड पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. 

काय घडले नेमके?

सिडकोतील शिवशक्तीनगर भागातील रेशन दुकानात नागरिकांना धान्य देत असताना नगरसेविका अलका आहिरे उपस्थित होत्या. स्वस्त धान्य दुकानात मिळणारे धान्य सरकारच्या योजनेतून मिळत असताना लोकप्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित राहत असल्याने पत्रकार प्रमोद दंडगव्हाळ यांनी "आयजीच्या जिवावर बायजी उदार' या मथळ्याखाली बातमी ऑनलाइन प्रसिद्ध केली. यानंतर नगरसेविका पती कैलास आहिरे यांनी दंडगव्हाळ यांच्याशी संपर्क करून त्यांना मोबाईलवर ठार करण्याची धमकी दिली. त्याचबरोबर, "तू सिडकोत दिसलास, तर मी तुझ्याकडे बघतो', असा दम देऊन शिवीगाळ केली. हा प्रकार घडल्यानंतर पत्रकाराने अंबड पोलिसांत तक्रार दाखल केली.

पत्रकाराला धमकावल्याप्रकरणी गुन्हा दाखल

या प्रकरणी पोलिस आयुक्त विश्‍वास नांगरे-पाटील यांच्या आदेशावरून उपायुक्त विजय खरात व सहाय्यक आयुक्त मंगलसिंग सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक कुमार चौधरी तपास करीत आहेत. या प्रकरणी अनेक सामाजिक संस्था व पत्रकार संघातर्फे जाहीर निषेध करण्यात आला आहे. तसेच कोणत्याही राजकीय नेत्याने दमदाटी केल्यास अशा नेत्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी पत्रकारांतर्फे करण्यात आली. 

हेही वाचा > संतापजनक! कोरोनाबाधित रूग्णाचा अंगावर थुंकण्याचा प्रकार..अँम्ब्युलन्स चालकाला मारहाण

VIDEO : जेव्हा विश्वास नांगरे पाटलांना आदेश मिळतो "तुम्ही बाहेर सीपी असाल, पण इथले 'एसीपी' आम्ही आहोत"!